समीर देशपांडे ।कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नावाची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली असताना प्रत्यक्षात शासन आदेश काढताना त्यांच्याऐवजी चक्क अधिकाऱ्यालाच अध्यक्ष करण्याची किमया महसूल आणि वनविभागाने केली आहे. त्यामुळे संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
अधिवेशनामध्ये १६ मार्च २०१८ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात हत्ती, गवे यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावरील चर्चेला वनमंत्री मुनगंटीवर यांनी सविस्तर उत्तर देताना कर्नाटकातून प्रशिक्षित हत्ती आणून कोल्हापूर जिल्ह्यातील हत्तींना कर्नाटकात पाठविणार असल्याचे सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, भुदरगड, राधानगरी तालुक्यांमध्ये हत्ती व अन्य प्राण्यांमुळे शेती व मालमत्तेचे नुकसान होते. याबाबत ‘लक्षवेधी’ला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार असल्याची घोषणा केली तसेच आमदार संध्यादेवी कुपेकर या समितीच्या सदस्य असतील तर मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर हे सचिव असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
मात्र, प्रत्यक्षात सोमवार, १९ मार्च २०१८ रोजी महसूल व वनविभागाने जो शासन आदेश काढला, त्यामध्ये आमदार आबिटकर यांच्याऐवजी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर या अधिकाºयांना अध्यक्ष करण्यात आले असून, दुसऱ्या क्रमांकावर मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिसºया क्रमांकावर सदस्य म्हणून आमदार संध्यादेवी कुपेकर यांची नियुक्ती असून, ज्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा झाली होती ते आमदार प्रकाश आबिटकर यांचा चौथ्या क्रमांकाचे सदस्य म्हणून या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे, तर उपवनसंरक्षक प्रादेशिक कोल्हापूर यांची सदस्य म्हणून या समितीत नियुक्ती केली आहे. खुद्द मंत्र्यांनीच एकीकडे अशा पद्धतीने आमदारांची केलेली अध्यक्षपदासाठीची घोषणा त्यांच्याच विभागाने रद्द करण्याचा प्रताप केला आहे.अधिकाऱ्यांच्या हाताखाली आमदारजिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली आमदारांना काम करण्याची वेळ महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाने संबंधितांवर आणली आहे. अधिवेशनात घोषणा आणि प्रत्यक्षात शासन आदेश काढताना वेगळीच नावे, असा उफराटा कारभार करण्यात आला आहे.१६ मार्चला प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणाप्रत्यक्षात १९ मार्चला आदेशात आबिटकर यांच्याऐवजी मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांचे नाव अध्यक्षस्थानी.