शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

कुष्ठरोगी बांधवांना माणूस म्हणून वागवा : उपमहापौर शेटे यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:35 AM

कुष्ठरोग हा शाप नसून इतर रोगाप्रमाणे तोही एक रोग आहे. नियमित औषधोपचारानंतर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून समाजाने कुष्ठरोगी बांधवांना वाळीत न टाकता माणूस म्हणून वागविले पाहिजे, असे आवाहन उपमहापौर भूपाल शेटे यांनी केले.

ठळक मुद्दे कुष्ठरोगी बांधवांना माणूस म्हणून वागवा : उपमहापौर शेटे यांचे आवाहनकुष्ठरोगी बांधवांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप

कोल्हापूर : कुष्ठरोग हा शाप नसून इतर रोगाप्रमाणे तोही एक रोग आहे. नियमित औषधोपचारानंतर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून समाजाने कुष्ठरोगी बांधवांना वाळीत न टाकता माणूस म्हणून वागविले पाहिजे, असे आवाहन उपमहापौर भूपाल शेटे यांनी केले.जवाहरनगर येथील उपमहापौर शेटे कुटुंबीयांतर्फे गेली २८ वर्षे कुष्ठरोगी बांधवांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप केले जाते. यावर्षीही स्वाधारनगर येथील ६५ विद्यार्थ्यांना भूपाल शेटे व त्यांच्या पत्नी शशिकला शेटे यांच्या हस्ते स्वखर्चातून शालेय साहित्य वाटण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.कुष्ठरोग हा संसर्गजन्य, तसेच आनुवंशिक असल्याचा गैरसमज आहे; मात्र हा गैरसमज अत्यंत चुकीचा आहे. तो आनुवंशिक असता तर कुष्ठरोगींची मुले हा रोग घेऊनच जन्माला आली असती; पण तसे काही घडलेले नाही. कुष्ठरोगींची मुलेही सामान्य मुलांप्रमाणेच आहेत. जर हा रोग संसर्गजन्य असता, तर तो मला झाला असता; कारण मी त्यांच्यासोबत गेली ४0 वर्षे काम करत आहे; त्यामुळे हा गैरसमजदेखील चुकीचा आहे, असे शेटे यांनी सांगितले.निसर्गाच्या कोपामुळे त्यांच्या आयुष्यात कुष्ठरोग झाला. अनेक कुष्ठरोगी पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना काम करून जीवनाचा चरितार्थ चालवायचा आहे; मात्र समाज अजूनही त्यांना स्वीकारण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. म्हणूनच समाजाने त्यांना माणूस म्हणूनच वागविले पाहिजे, त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.यावेळी भूपाल शेटे, माजी नगरसेविका शशिकला शेटे यांच्या हस्ते ६५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जयंत लाटकर, बापू जाधव, प्रसाद शेटे, नितीन पोवार, शिवाजी पंदारे, शिरीष कारंडे, रवी बामणेकर, युवराज घाडगे, रोहित बागडेकर उपस्थित होते.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर