कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने दि. ३० जानेवारी ते दि. १३ फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियान राबवविण्यात येणार आहे. यानिमित्त विविध उपक्रमांद्वारे जनजागृती केली जाईल.कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियानांतर्गत रविवारी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कुष्ठरोग मुक्त भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील, अशी शपथ घेत निर्धार करण्यात आला.भारत सरकारच्या २००३ च्या तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तंबाखू व सिगारेटमुक्त भारत, अशी शपथ घेण्यात आली. तंबाखू, जर्दा, खर्रा, तसेच बिडी, सिगारेट, ई-हुक्का, ई-सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे, असा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.यावेळी महापौर सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी, गटनेते सत्यजित कदम, अजित ठाणेकर, सुनील पाटील, नगरसेवक अशोक जाधव, आशिष ढवळे, ईश्वर परमार, जय पटकारे, नगरसेविका उमा बनछोडे, जयश्री जाधव, रूपाराणी निकम, कविता माने, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कार्यकारी अभियंता एस. एल. माने उपस्थित होते.