शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

Rain update: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट; मात्र २७ बंधारे पाण्याखालीच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 1:50 PM

पूरबाधित क्षेत्रातील कुटुंबांना दिलासा मिळाला. मात्र तळकोकण आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने २७ बंधारे पाण्याखाली आहेत.

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाला ब्रेक लागला. आज, शुक्रवार सकाळपासून अधून-मधून सरी बरसत असल्या तरी पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ३१ फूट  ३ इंच इतकी झाली आहे. इशारा पातळीकडे जाणारे पाणी कमी होत आहे. परिणामी पूरबाधित क्षेत्रातील कुटुंबांना दिलासा मिळाला. मात्र तळकोकण आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने २७ बंधारे पाण्याखाली आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.काल, गुरुवार अन् आज पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभर आकाश ढगांनी भरून राहिले. राहून राहून पावसाच्या बारीक सरी कोसळत होत्या. मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री पंचगंगा नदी पातळी ३२.५ वर पोहचली. इशारा पातळी ३९ असल्याने त्या दिशेने पाणी वाढत होते. पण काल, गुरुवारी सकाळपासूनच पाऊस कमी झाला. यामुळे स्थलांतरित होण्याची तयारी करणाऱ्या कुटुंबांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

गाफील राहू नका...पंचगंगा पाणी पातळी कमी होत असल्याने शहरातील अनेक जण कुटुंबासह पंचगंगा घाटावर पाणी पाहण्यासाठी आले होते. पाणी पाहण्यासाठी आलेल्या काहींना नदीसह सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.राधानगरी धरण

राधानगरी धरणात १०० दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला आहे. धरणातून १२०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. यामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे.

२७ बंधारे पाण्याखालीपंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वाळोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर, धामणी नदीवरील सुळे व अंबार्डे, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे बंधारे पाण्याखाली आहेत.धरणसाठा असा (पाणीसाठा दलघमीमध्ये)

तुळशी : ४३.७४, वारणा : ३८४.४४, दूधगंगा : २३८.६७८, कासारी :३७, दलघमी, कडवी : २८.५, कुंभी : ३६.५६, पाटगाव : ४५.४, चिकोत्रा : २०.२५, चित्री : १९.४९, जंगमहट्टी : १५.१०, घटप्रभा: ४४.१७, जांबरे : १२.५१, आंबेआहोळ : १९.९५.

तालुकानिहाय पाऊसगुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय असा : हातकणंगले: ७, शिरोळ : ४.१, पन्हाळा : २८.८, शाहूवाडी : २४.६, राधानगरी : ३५.१, गगनबावडा : ८०.६, करवीर :१५.२, कागल :१८, गडहिंग्लज : १९.१, भुदरगड : ४४.३, आजरा : ४२.५, चंदगड : ३२.३.

अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान खात्याने आज, शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे सर्व शासकीय यंत्रणा सतर्क आहेत. आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाल्यास ०२३१-२६५९२३२, ०२३१-२६५२९५०, ०२३१-२६५२९५३, ०२३१-२६५२९५४ या दूरध्वनी क्रमांकावर आणि १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीWaterपाणी