शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

सोईच्या ‘एस.टी.’कडे कामगारांची पाठ -: अवैध खासगी वाहनांतून प्रवास करण्यास वाढतोय कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 1:04 AM

ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला रोजगारासाठी ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे व वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना अवैध

ठळक मुद्देअपघाताला निमंत्रण!

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला रोजगारासाठी ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे व वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना अवैध खासगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. हे लक्षात घेऊन परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने त्यांच्या सोईसाठी गावांतून एमआयडीसीपर्यंत एस.टी.ची विशेष सोय केली आहे. मात्र, याकडे कामगारांनी दुर्लक्ष करून अशा धोकादायक वाहतुकीद्वारे प्रवास करीत असल्याने पुन्हा एकदा अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.

गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित, शिरोली या औद्योगिक वसाहतींत ग्रामीण भागातील कामगार मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी येतात. काहीजण दुचाकीवरून प्रवास करतात; पण ज्यांच्याकडे दुचाकी नाही, त्या कामगारांना व्हॅन, अ‍ॅपे रिक्षा, रिक्षा, जीप यांतून प्रवास करावा लागतो आहे. हे वाहनधारक जास्त पैसे मिळविण्याच्या उद्देशाने जास्त प्रवासी बसवून जादा फेऱ्यांसाठी वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. रात्री-अपरात्री दुचाकीवरून प्रवास करताना कामगारांना समस्यांना सामोरे जावे लागते.

कामगार प्रवाशांच्या मागणीनुसार परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे कामगारांच्या सोईसाठी एस.टी. उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गोकुळ शिरगाव, शिरोली, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालते. त्यानुसार एस.टी. गाड्या सोडण्याचे व कामगारांना ने-आण करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे कामगारांचा प्रवास सुखकारक आणि सुरक्षित होणार आहे.उत्पन्न वाढविण्यासाठी खासगी वाहने !आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने एमआयडीसीमधील काही कर्मचाऱ्यांनी प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहने घेतली आहेत. यामधून ते इतर कर्मचाºयांना घेऊन जातात. एमआयडीसीमध्ये श्रमाचे काम, कामावर वेळेत पोहोचण्याच्या उद्देशाने अनियंत्रित वेगाने गाडी चालविल्याने डोळ्यांवर झापड येतेच; त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अपघातामुळे एक व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.कोल्हापूर विभागातर्फे २५ गाड्यांची सोयएमआयडीसीला जाणाºया कामगारांसाठी कोल्हापूर विभागाच्या वतीने २५ गाड्यांची सोय करण्यात आली आहे. तीन शिफ्टमध्ये ७५ फेºयांची सोय केली आहे. यामध्ये कोल्हापूर आगारामधून ०२, संभाजीनगर ०२, गडहिंग्लज ०४, गारगोटी : ०३, कागल : १०, राधानगरी : ०४ या मार्गांवर गावातून गाडीची सोय केली आहे. मात्र, प्रवासी याकडे पाठ फिरवीत आहेत. 

 

अवैध प्रवासातील धोके समोर आल्याने कामगारांच्या मागणीनुसार तीन शिफ्टमध्ये एस.टी.ची सोय केली आहे. यासाठी सवलतीचा पास दिला जातो. मात्र, बहुतांश कामगार एस.टी. बसची सेवा सुरक्षित असतानाही तिचा लाभ घेत नाहीत.- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग

उत्पन्न वाढविण्यासाठी खासगी वाहने !आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने एमआयडीसीमधील काही कर्मचाऱ्यांनी प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहने घेतली आहेत. यामधून ते इतर कर्मचाऱ्यांना घेऊन जातात. एमआयडीसीमध्ये श्रमाचे काम, कामावर वेळेत पोहोचण्याच्या उद्देशाने अनियंत्रित वेगाने गाडी चालविल्याने डोळ्यांवर झापड येतेच; त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अपघातामुळे एक व्यक्ती नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे.कोल्हापूर विभागातर्फे २५ गाड्यांची सोयएमआयडीसीला जाणाºया कामगारांसाठी कोल्हापूर विभागाच्या वतीने २५ गाड्यांची सोय करण्यात आली आहे. तीन शिफ्टमध्ये ७५ फेºयांची सोय केली आहे. यामध्ये कोल्हापूर आगारामधून ०२, संभाजीनगर ०२, गडहिंग्लज ०४, गारगोटी : ०३, कागल : १०, राधानगरी : ०४ या मार्गांवर गावातून गाडीची सोय केली आहे. मात्र, प्रवासी याकडे पाठ फिरवीत आहेत.अवैध प्रवासातील धोके समोर आल्याने कामगारांच्या मागणीनुसार तीन शिफ्टमध्ये एस.टी.ची सोय केली आहे. यासाठी सवलतीचा पास दिला जातो. मात्र, बहुतांश कामगार एस.टी. बसची सेवा सुरक्षित असतानाही तिचा लाभ घेत नाहीत.- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातstate transportएसटी