शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

कोल्हापूर : कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देऊ : सुरेश हाळवणकर; सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 6:33 PM

‘सिद्धगिरी महासंस्थान’मधील कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी येथे केले. देशाच्या कानाकोपऱ्यांतील विविध कारागिरी, कलांचा समावेश असलेल्या सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा भाविक, नागरिकांच्या गर्दीत समारोप झाला.

ठळक मुद्देकारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देऊ : सुरेश हाळवणकरसिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा समारोपमहाकुंभाला आठ लाख लोकांची भेट

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी महासंस्थान’मधील कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी येथे केले. देशाच्या कानाकोपऱ्यांतील विविध कारागिरी, कलांचा समावेश असलेल्या सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा भाविक, नागरिकांच्या गर्दीत समारोप झाला.कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे हा कारागीर महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. श्री विश्वकर्मा कारागीर नगरीतील या कार्यक्रमास राममंदिर न्यास कमिटीचे अध्यक्ष स्वामी रामविलास वेदांत, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बसवराज पाटील, बेळगांवच्या मितान फौंडेशनचे गोपीकृष्णन, कोल्हापूर विभागाचे माहिती संचालक सतीश लळीत, प्रमुख उपस्थित होते.

आमदार हाळवणकर म्हणाले, सिद्धगिरी महासंस्थानचे काम भव्य-दिव्य आहे. हजारो वर्षांची कारागीर, कलांच्या जपण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल या कारागीर महाकुंभाच्या माध्यमातून पडले आहे. देशभरातील विश्वकर्मांना एकत्रित करून राबविलेला हा उपक्रम श्रमशक्तीचा महाकुंभ ठरला.

सिद्धगिरी कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. आवश्यक त्या परवानगी देण्याची जबाबदारी माझी राहील. शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासाठी सिद्धगिरीवरील ‘लखपती शेती’चे तंत्रज्ञान देशभरात जाण्याची गरज आहे. त्यासह येथील गुरुकुल शिक्षणपद्धती ही देश बळकट करण्यास उपयुक्त ठरणार आहे. अशा गुरुकुल पद्धतीवरील शाळा शासनाने सुरू कराव्यात.

या कार्यक्रमात महाकुंभातील सहभागी कारागीरांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कारागीरांना ‘कोल्हापुरी फेटा’ बांधून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, बसंतकुमार सिंग, योगीप्रभू, रामबाबू, सुरेश पाटील, नाना पठारे, हिंदुराव शेळके, प्रताप कोंडेकर, आर. डी. शिंदे, डॉ. संदीप पाटील, आदी उपस्थित होते.

महाकुंभाला आठ लाख लोकांची भेटया महाकुंभात देशाच्या कानाकोपऱ्यांतील १२० कारागीर सहभागी झाले. त्यांच्या माध्यमातून पाचशे कला, कारागिरीचे दर्शन घडले. दोनशेहून अधिक गायी, बैलजोड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. महाकुंभाला पाच दिवसांत सुमारे आठ लाख लोकांनी भेट दिली. शंभर साधू-संत सिद्धगिरी मठावर आले. दरवर्षी कारागीर महाकुंभ भरविण्याचा विचार सिद्धगिरी महासंस्थान करत असल्याचे अमित हुक्केरीकर यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :Suresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकरkolhapurकोल्हापूर