शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

असू दे मीटर बंद; भाडं फिक्स!

By admin | Published: February 18, 2015 10:41 PM

मनमानीला चाप : उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ठरवून दिले अंतरानुसार रिक्षाभाडे

सातारा : बसस्थानकावर उतरून रिक्षा करावी तर बसताक्षणी ‘सत्तर रुपये होतील’ हे वाक्य अनेकदा ऐकावं लागतं. ‘मीटरप्रमाणं घ्या’ म्हटलं की ‘मीटर बंद आहे,’ हे ठरलेलं उत्तर. मनमानी भाडेआकारणीच्या अनेक तक्रारी आल्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी यावर रामबाण उपाय शोधला आहे. बसस्थानकापासून विविध ठिकाणचे अंतरानुसार प्रवासभाडे किती होते, याची यादीच त्यांनी प्रकाशित केली असून, त्यानुसारच भाडे द्यावे, असे आवाहन प्रवाशांना केले आहे.शहरातील सर्व आॅटोरिक्षाचालकांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची सक्ती करण्यात आली. परंतु हे मीटर नादुरुस्त आहेत, असे भासवून अनेक रिक्षाचालक प्रवाशांकडून जादा दराने भाडेआकारणी करतात, अशा तक्रारी येऊ लागल्या. बऱ्याच वेळा ‘सातारचे रस्ते खराब असून, त्यामुळे मीटर नीट चालत नाही. मीटर बिघडतो,’ असेही रिक्षाचालकांकडून सांगितले जाते. एखाद्या ठिकाणी ‘येताना रिकामे यावे लागते,’ असे कारण सांगूनही जादा भाडे आकारले जाते. यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बसस्थानकापासून विविध ठिकाणचे अंतर मोजून अंदाजे भाडेदर निश्चित केले. त्याहून अधिक भाडे देऊ नये, असे आवाहन त्यांनी प्रवाशांना केले आहे. (प्रतिनिधी)गुपचूप  करा तक्रारअंतरानुसार अंदाजे भाडेदर जाहीर केले असून, मीटरपेक्षा अधिक भाड्याची मागणी रिक्षाचालकाने केल्यास तक्रार करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. तक्रारीत रिक्षा क्रमांक, प्रवासाचा दिनांक, वेळ, स्थळ, तक्रारीचे स्वरूप यासह तक्रारदाराचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक नमूद करावा. तक्रारदाराचे नाव उघड करण्यात येणार नाहीे. तसेच सर्व रिक्षाचालकांनी आपले मीटर निर्दोष असल्याची खात्री करावी. मीटर खराब, नादुरुस्त तसेच बंद असणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याचा इशाराही राऊत यांनी दिला आहे. बसस्थानकापासून विविध ठिकाणचे अंतर (किमीमध्ये) व रिक्षाभाडेजिल्हा परिषद१.८२४.००बॉम्बे रेस्टॉरंटमार्गे २.७३७.००कृष्णानगर (बॉम्बे रेस्टॉरंटमार्गे) ३.०४१.००संगमनगर (बॉम्बे रेस्टॉरंटमार्गे) ४.१५६.००रेल्वे स्टेशन (बॉम्बे रेस्टॉरंटमार्गे) ७.५ १०४.००शिवराज पेट्रोल पंप३.३४५.००गोडोली नाका २.०२७.००देगाव फाटा (गोडोली नाकामार्गे)४.६६३.००गणेश चौक (गोडोली नाकामार्गे)५.२७२.००कोडोली (गोडोली नाकामार्गे)५.८८०.००अ‍ॅरिस्टोक्रॅट (गोडोली नाकामार्गे)७.१९८.००अजिंक्यबझार चौक शाहूनगर १.७२३.०० (मोनार्कमार्गे)गुरुकुल शाळा (मोनार्कमार्गे)२.४३३.००राजवाडा (कमानी हौदमार्गे)२.९४०.००समर्थमंदिर (कमानी हौद, ३.७५०.०० राजवाडामार्गे)बोगदा (कमानी हौद, ४.०५५.०० राजवाडामार्गे)मंगळवार तळे (कमानी हौद, ३.४४७.०० राजवाडामार्गे)समर्थमंदिर (अदालत वाडामार्गे)३.३४५.००बोगदा (अदालत वाडामार्गे)४.५६२.००शाहूपुरी (रिमांड होममार्गे)२.९४०.००सदरबझार चौक (रिमांड होममार्गे)२.०२७.००वाढे फाटा (पोलीस परेड ३.०४१.०० ग्राउंडमार्गे)मोळाचा ओढा २.९४०.००तामजाईनगर (पोदार स्कूल)२.३३१.००पिलेश्वरनगर२.०२७.००