पाटील म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीची निवड करून पक्षकार्य वाढवणे, गाव तेथे शाखा स्थापन करणे, आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी सर्व तयारीनिशी सज्ज राहावे. या सर्व निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर राहील.
सरपंच आर. वाय. पाटील यांनी स्वागत केले. विठ्ठल संस्था अध्यक्ष दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. या वेळी पुरस्कारप्राप्त विनय पाटील, पंचायत समिती माजी सभापती दिलीप कांबळे, अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष शाकीर पाटील, गणी कलोट यांचा सत्कार ए. वाय. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी गोकुळ संचालक किसन चौगुले, नंदू पाटील, संचालक एकनाथ पाटील, नेताजी पाटील, भिकाजी एकल, सर्जेराव पाटील, पंचायत समिती उपसभापती मोहन पाटील, वाय. डी. पाटील, दीपक पाटील, शिवाजी पाटील, मानसिंग पाटील, राजू कवडे उपस्थित होते.
स्वप्निल पानारी यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास पाटील यांनी आभार मानले.
फोटो - सोळांकूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत राजर्षी शाहू पुरस्कारप्राप्त विनय पाटील यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील.