डाव्या व पुरोगामी संघटनांच्या वतीने शनिवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या आदरांजलीच्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, संशोधनासाठी भारतात येऊन इथल्या कष्टकरी, आदिवासी, दलित, परितक्त्या स्त्रिया अशा सर्वांच्या मुक्तीच्या व संघर्षाच्या चळवळीत झोकून देऊन काम केले. अनेक आंदोलने केली. त्यासोबतच चळवळींना दिशादर्शक ठरेल असे तत्त्वज्ञान मांडणारे ग्रंथसुद्धा लिहिले.
प्रा. टी. एस. पाटील म्हणाले, डॉ. ऑम्वेट यांनी दिलेले वैचारिक अधिष्ठान घेऊन मोठी चळवळीची ताकद उभी करणे, हीच खरी आदरांजली ठरेल. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. सुभाष जाधव म्हणाले, देशातील बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन डाव्या चळवळी अधिक सक्षम बनविणे, अधिकाधिक कार्यकर्ते घडवून त्यांना प्रतिगामी शक्तींच्या विरोधात संघर्षरत करणे, ही कृतिशील आदरांजली देण्यासाठी काम केले पाहिजे.
यावेळी सुभाष गुरव, स्वाती कृष्णात, शेखर चैतन्य, राजवैभव शोभा रामचंद्र यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाबूराव कदम, कुमार जाधव, रवी जाधव, संभाजीराव जगदाळे, अशोक जाधव, डॉ. अनमोल कोठाडीया, अतुल वाघ, हर्षल जाधव, ऐश्वर्या कावेरी संजय, आदी उपस्थित होते.
---
फोटो नं २८०८२०२१-कोल-गेल ऑम्वेट
ओळ : कोल्हापुरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात डाव्या व पुरोगामी संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या शोकसभेत डॉ. गेल ऑम्वेट यांना आदरांजली वाहण्यात आली.