शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

रक्ताचं नातं जोडू, माणुसकीची ज्योत तेवत ठेवू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:15 AM

‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा ...

‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला व्यापक स्वरूप देत २ ते १५ जुलैदरम्यान जिल्ह्यात हे महारक्तदान शिबिराचे अभियान चालवले जाणार आहे. याचे उद्‌घाटन शुक्रवारी सकाळी नागाळा पार्क येथील शाडू ब्लड सेंटरमध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक व ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, रोटरी समाज सेवा केंद्राचे राजेंद्र देशिंगे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष मेघराज चुग, सचिव केदार राठोड, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, विक्रम चहाचे एरिया सेल्स मॅनेजर अभिजित देशमुख उपस्थित होते.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या कठीण काळात रक्तदान हे मौल्यवान दान आहे, सध्या राज्यात सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा आहे. शासनाकडून वारंवार नागरिकांना रक्तदान करा, असे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर घेतलेल्या रक्तदान शिबिर मोहिमेमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही चळवळ यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे आणि राज्यातून ५० हजारच नव्हे, तर १ लाख पिशव्या रक्ताचे संकलन व्हावे, अशा माझ्या शुभेच्छा आहेत.

‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात २० हजार पिशव्या इतके कमी रक्त शिलल्क आहे. सध्याच्या अडचणीच्या काळात रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज आहे. ही गरज भागवण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्हा, तालुके व गावागावांत ही मोहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.

उद्‌घाटन सत्रानंतर दिवसभर रक्तदानासाठी नागरिकांची शाहू ब्लड सेंटरवर गर्दी होती. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांंनी रक्तदान करून या अभियानात सहभाग नोंदविला.

---

पहिला दाता

रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन होण्यापूर्वीच अनेक नागरिक रक्तदानासाठी आले होते. बांधकाम साहित्याचा व्यवसाय असलेले सोहेल जमादार हे या अभियानाचे पहिले रक्तदाते ठरले. मी ‘लोकमत’चा नियमित वाचक आहे. गेली तीन-चार दिवस रक्तदानाच्या बातम्या वाचत होतो. चांगल्या कार्यात आपलेही योगदान असावे म्हणून मी रक्तदानासाठी पुढे आलो. ‘लोकमत’च्या या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

--

फोटो नं ०२०७२०२१-कोल-सोहेल जमादार

--

लग्नाचा वाढदिवस रक्तदानाने...

येथील जाहिरात एजन्सीचे मालक मंदार व अनुजा तपकिरे यांच्या लग्नाचा शुक्रवारी पाचवा वाढदिवस होता. हा दिवस त्यांनी रक्तदानाने साजरा केला. ‘लोकमत’ने रक्तदान शिबिराची सुरुवात केली त्यावर्षीपासून मी या अभियानाशी जोडलो आहे. एकाने रक्तदान केल्याने तीन लोकांचा जीव वाचतो. कोरोनाच्या या परिस्थितीत सामाजिक कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही दोघांनीही रक्तदान केले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

--

आजचे शिबिर

सकाळी १० ते ४ : जीवनधारा ब्लड बँक, राजारामपुरी, कोल्हापूर

सकाळी ९ ते २ : एस. जे. फौंडेशन, त्र्यंबोली लॉन, लाईन बझार, कोल्हापूर

---

फोटो नं ०२०७२०२१-कोल-मंदार तपकिरे

मंदार व अनुजा तपकिरे यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस शुक्रवारी रक्तदानाने साजरा केला.

----

फोटो नं ०२०७२०२१-कोल-रक्तदान शिबीर०१

ओळ : ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’च्यावतीने शु्क्रवारपासून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नागाळा पार्क येथील शाहू ब्लड सेंटर येथे झाला. यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, शाहू ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, रोटरी समाज सेवा केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र देशिंगे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे मेघराज चुग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--

०२

शिबिराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

--

कंपोझिट लोगो वापरावा