सर्वाधिक नगरसेवक निवडून आणूया , शहर कॉग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 07:02 PM2020-12-24T19:02:40+5:302020-12-24T19:05:52+5:30
congress Kolhapur News- कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणूया, असे निर्धार कोल्हापूर शहर जिल्हा कॉग्रेस समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण होते.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉग्रेस पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणूया, असे निर्धार कोल्हापूर शहर जिल्हा कॉग्रेस समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण होते.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात शहर कॉग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कॉग्रेस समिती कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. कॉग्रेस पक्षाने ही निवडणूक स्वतंत्र लढवावी तसेच निवडून आल्यानंतर महाआघाडी करुन महापालिकेत सत्ता स्थापन करावी, असा सूर या बैठकीत पदाधिकाऱ्यांमधून उमटला.
महानगरपालिकेत कॉग्रेसची सत्ता येण्यासाठी सक्षम तसेच जनाधार असलेल्या उमेदवारांना पक्षाचे तिकीट द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी.एन.पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण या नेत्यांनी निवडणूक पूर्व किंवा निवडणुकीनंतर जो काही आघाडी संदर्भात निर्णय घेतील त्यास सर्व पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली.
यावेळी ब्लॉक अध्यक्ष संपतराव पाटील, सरलाताई पाटील, संध्या घोटणे, वैशाली महाडिक, महंमद शरिफ शेख, संग्राम गायकवाड, लिला धुमाळ, पार्थ मुंडे, सर्फराज रिकबदार यांनी आपली मते मांडली. तर किरण मेथे, मुनाफ बेपारी, आकाश शेलार, सुजीत देसाई, अन्वर शेख, मंगल खुडे, पुजा आरडे, हेमलता माने, विद्या घोरपडे, निर्मल सालढाणा, उज्वला चौगुले, सौ.शेजवळ, यशवंत थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी किशोर खानविलकर यांनी स्वागत केले तर डॉ. प्रमोद बुलबुले यांनी आभार मानले.