कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागात गेल्या काही वर्षापासून झालेल्या घोटाळ्याची माहिती जनतेसमोर जाहीर न केल्यास कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे कार्यकर्ते महापालिकेच्या इमारतीवरुन उड्या मारुन जीव देतील, असा इशारा कृती समितीने बुधवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला.कृती समितीच्या शिष्टमंडळाने दुपारी अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त विनायक औंधकर यांची भेट घेऊन घरफाळा विभागातील घोटाळ्यासंबंधी जाब विचारला. घरफाळा घोटाळ्याची किती प्रकरणे आहेत, त्याची चौकशी झाली आहे का, चौकशी झाली असेल तर दोषींवर काय कारवाई केली, घोटाळ्यातील रक्कम वसुलीसाठी काय कार्यवाही केली, कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम कोण करीत आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती करुन दोन्ही अधिकाऱ्यांना भंडावून सोडले.गेल्या वर्षभरात घरफाळा घोट्याळ्याची जी प्रकरणे समोर आली, त्याची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशी एकदा नाही तर तीन वेळा झाली. त्याचा अहवाल प्रशासक बलकवडे यांच्याकडे शुक्रवारीच सादर करण्यात आला आहे. जे जे कर्मचारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, शिवाय ज्यांनी घरफाळा चुकविला आहे, त्यांच्याकडून तो वसुलही करता येऊ शकतो, असे सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या इमारतीवरुन उड्या मारुन जीव देवू, कृती समितीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 6:03 PM
Muncipal Corporation Kolhapur-कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागात गेल्या काही वर्षापासून झालेल्या घोटाळ्याची माहिती जनतेसमोर जाहीर न केल्यास कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे कार्यकर्ते महापालिकेच्या इमारतीवरुन उड्या मारुन जीव देतील, असा इशारा कृती समितीने बुधवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला.
ठळक मुद्देमहापालिकेच्या इमारतीवरुन उड्या मारुन जीव देवू, कृती समितीचा इशारा घरफाळा घोटाळ्याची माहिती जाहीर करण्याची मागणी