कोल्हापूर : ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’असे ब्रीद घेऊन सुरुवात झालेल्या ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमातून कोल्हापूरकरांनी गेल्या वर्षी अनेक गरीबांची दिवाळी आनंदी केली. कोल्हापूरकरांचे दातृत्वाची ओळख देशभरात पोहाचविणारा हा उपक्रम यावर्षी शनिवारी (दि. १४) आणि रविवारी (दि. १५) दसरा चौकात राबविण्यात येणार आहे.
माणुसकीची भिंत हा उपक्रम गेल्या दिवाळीपासून कोल्हापुरातील सीपीआर चौकात सुरू झाली. या उपक्रमाला दातृत्ववान कोल्हापूरकरांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. त्यामुळे वापरता येतील असे दोन लाखांहून अधिक कपडे गरजू लोकांपर्यंत पोहाचवता आले. कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचे अनुकरण करीत पुणे, मुंबई, बिहार, छत्तीसगड यासह अन्य ठिकाणी माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या. यावर्षी शनिवारी (दि. १४) आणि रविवारी (दि. १५) सकाळी नऊ ते सायंकाळी सात यावेळेत दसरा चौकात पुन्हा माणुसकीची भिंत उभी राहणार आहे. याठिकाणी कोल्हापूरकरांनी वापरण्यायोग्य नवे-जुने कपडे माणुसकीच्या भिंतीवर देवून गरीबांची दिवाळी आनंदी करण्यासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन या उपक्रमाच्या संयोजकांनी केले आहे. दानशूर कोल्हापूरकरांनी ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमासाठी इतरांना वापरता येतील असे कपडे दान करावेत. कपडे देताना ते स्वच्छ धुवून, इस्त्री करुन आणि पुरूष, मुले आणि महिला अशी वर्गवारी करुन दिल्यास ते गरीब गरजूंना अधिक चांगल्या पद्धतीने देता येतील. या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या उपक्रमाच्या संयोजनासाठी सुधर्म वाझे, प्रसाद पाटील, अमर पाटील, सुरज पाटील, गणी आजरेकर, सचिन पाटील, निनाद कामत, देवेंद्र रासकर, प्रशांत पोकळे, इम्तियाज मोमीन आदी परिश्रम घेत आहेत......................................................................................व्हॉटस्अॅप ग्रुपवरील चर्चेतून साकारला उपक्रम‘लोकमत फॅन क्लब’ या व्हॉटस्अॅप ग्रुपवरील चर्चेतून ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाची सुरुवात झाली. त्याला आमदार सतेज पाटील यांनी पाठबळ दिले. गेल्या वर्षी तीन दिवसाच्या उपक्रमात २५६९ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घरातील जुनी मात्र, वापरण्यायोग्य १ लाख ७९ हजार ८३० कपडे या उपक्रमासाठी जमा केले. यातून दीड लाखाहून अधिक गरजू, गरीबांनी येथून कपडे घेवून दिवाळी आनंदाने साजरी केली. गुढी पाडव्या निमित्त दुसºया सुरू केलेल्या या उपक्रमातही लाखाहून अधिक जणांनी याचा लाभ घेतल्याचे संयोजकांनी सांगितले