शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

सरकारी आश्रयदाते सेलिब्रिटींचे तुणतुणे बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:21 AM

कोल्हापूर : आम्ही घुसखोर, आतंकवादी नाही, शेतकरी आहोत, आम्हाला देशप्रेम तुमच्याकडून शिकण्याची अजिबात गरज नाही. सरकारचे लाभार्थी, आश्रयदाते म्हणून ...

कोल्हापूर : आम्ही घुसखोर, आतंकवादी नाही, शेतकरी आहोत, आम्हाला देशप्रेम तुमच्याकडून शिकण्याची अजिबात गरज नाही. सरकारचे लाभार्थी, आश्रयदाते म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधात ट्विटरवरून टिवटिव करत असाल, करोडो लाेकांनी दिलेल्या प्रेमाला विसरणार असाल तर तुमचे तुणतुणे कायमचे बंद करू, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी बॉलीवूड व क्रिकेटमधील सेलिब्रिटींना दिला आहे.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आवाहनानुसार शनिवारी दुपारी कोल्हापुरातही चक्का जाम आंदोलन झाले. पोलिसांनी रस्ता अडवण्यास मज्जाव केल्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मारत राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि ट्विटरद्वारे शेतकरी आंदोलनाची बदनामी करणाऱ्या सेलिब्रिटींवर चौफेर टीका केली. शेट्टी म्हणाले, तुम्ही जरूर सरकारचे लाभार्थी असाल; पण शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा, त्यांच्या देशभक्तीवर शंका घेण्याचा अधिकार कुठल्याही सरकारी तुकड्याकडे डोळे ठेवून बसलेल्या तथाकथित सेलिब्रिटींना दिलेला नाही. केंद्र सरकारवर टीका करताना शेतकरी आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सरकारने सोडावेत, नाही तर त्यांना खूप महागात पडेल. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी घेऊन दिल्लीला धडक देऊ, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

चौकट ०१

तर आर्थिक रसदही तोडू

शांततेने चाललेल्या आंदोलनात अप्‌प्रवृत्ती घुसवून, तिरंग्याचा अवमान करण्याचाही प्रयत्न केला गेला. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठीच हे सर्व केले आहे, तरीदेखील आम्ही अजून संयम दाखवून आहोत, त्याचा अंत पाहू नका. आंदोलनस्थळाच्या सोईसुविधा तोडून नाकाबंदी करत असाल तर देशातील करसंकलनाची महत्त्वाची संस्था असलेल्या दिल्लीतील जीएसटी आणि आयकर भवनला शेतकऱ्यांचा गराडा घालून केंद्र सरकारची सर्व रसद तोडू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

प्रतिक्रिया

दिल्लीतील आंदोलनकर्ते शेतकरी एकटे नाहीत, त्यांच्या मागे देशातील सर्व समाज उभा आहे, हा संदेश देण्यासाठीच हे चक्का जामचे आंदोलन केले. पण, सरकारी यंत्रणेवर दबाव आणून हे देखील मोडून पाडण्याचे काम होत असेल तर येथून पुढे आम्ही शांततेने आंदोलन करू, हे गृहीत धरू नका.

राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना