लोकमत न्युज नेटवर्क
सावरवाडी : शासनाच्या नवनवीन योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य ग्रामपंचायत कर्मचारी करीत असतात. त्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण आग्रही असल्याचे करवीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयवंत उगले यांनी ग्वाही दिली .
करवीर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाद्वारे कोरोना काळातील केलेल्या कामाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. सुधारित किमान वेतन जिल्हा परिषद यांनी काढलेल्या आदेशानुसार काढण्यात यावे, प्रॉव्हिडंट फंड, सेवा पुस्तक पूर्ण करण्यासाठी कॅम्प आयोजित करावेत, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बबन पाटील (पाचगाव), शिवाजी पाटील (आरळे), अशोक पाटील (देवाळे), शिवाजी पोवार (भुयेवाडी), प्रकाश कांबळे (सावर्डे दुमाला), संभाजी राबाडे (सावरवाडी) आदी उपस्थित होते.