कोल्हापूर : लवकरच जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेवून लवकरात लवकर मार्ग काढून सर्व व्यापार सुरु करुन देवू, अशी ग्वाही खासदार संजय मंडलिक यांनी गुरूवारी दिली. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने खासदार मंडलिक यांची घरी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना मंडलिक यांनी हे आश्वासन दिले.चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, लॉकडाऊनमुळे व्यापार बंदला दोन महिने उलटून गेले. आता सरकारने व्यापाऱ्यांचा अंत न पाहता व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी. या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी शासनाचे सर्व नियम पाळत कोणतीही घोषणा न देता बुधवारी आंदोलन केले. मागण्यांचे फलक हातात घेत शहरातील जवळपास दोन हजार व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाच्या दारात थांबून लक्ष वेधले.यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष व फुटवेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार, प्लायवूड असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव, स्टोन ट्रेडर्स असोसिएशनचे सचिव धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष प्रदीप कापडिया, कन्झ्युमर असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी, संचालक विज्ञानंद मुंढे, माजी नगरसेवक तौफीक मुल्लाणी, कापड व्यापारी संघाचे अध्यक्ष संपत पाटील आदी उपस्थित होते.
कोल्हापुरातील सर्व व्यापार सुरु करुन देवू :खासदार मंडलिक यांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 6:23 PM
Sanjay Mandalik Kolhapur : लवकरच जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेवून लवकरात लवकर मार्ग काढून सर्व व्यापार सुरु करुन देवू, अशी ग्वाही खासदार संजय मंडलिक यांनी गुरूवारी दिली. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने खासदार मंडलिक यांची घरी भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना मंडलिक यांनी हे आश्वासन दिले.
ठळक मुद्देकोल्हापुरातील सर्व व्यापार सुरु करुन देवू खासदार मंडलिक यांची ग्वाही