गडहिंग्लज : कोरोनामुळे राज्य आर्थिक अडचणीत असतानाही महाराष्ट्राला जीएसटीची रक्कम द्यायला केंद्र सरकार तयार नाही.त्यामुळे प्रसंगी कर्ज काढू, पण नैसर्गिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करू, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिला.गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चंदगड व आजरा तालुक्यांचाही आढावा घेतला. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.जि.प.उपाध्यक्ष सतीश पाटील,नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची प्रमुख उपस्थिती होती.मुश्रीफ म्हणाले, अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे भात, भुईमुग, सोयाबीन आदी खरीप पिकांसह ऊसाचेही नुकसान झाले आहे.त्याचे पंचनामे तातडीने करून घ्यावेत. कोरोनाचे संकट अजूनही पूर्णत: टळलेले नाही. गणेशोत्सवानंतर वाढलेली रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नवरात्रीनंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याचा धोका आहे.त्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यायलाच हवी .कोरोनावर मात केल्याबद्दल मंत्री मुश्रीफ व प्रांताधिकारी विजया पांगारकर यांचा पंचायत समितीतर्फे गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या हस्ते सत्कार झाला. बैठकीस आमदार राजेश पाटील, भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, गडहिंग्लजचे तहसिलदार दिनेश पारगे, चंदगडचे तहसिलदार विनोद रणावरे,सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर व संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांचे कौतुक...!कोल्हापूर जिल्ह्यात अन्यत्र कोरोनाचा कहर सुरू असताना गडहिंग्लज,आजरा व चंदगड तालुक्यात कोरोना नियंत्रणात आहे. 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम येथील अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे राबवली आहे,अशा शब्दांत मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.पोस्ट कोविड सेंटर प्रयत्नशील !कोरोनावर मात केलेल्या रूग्णांची काळजी घेण्यासाठी गडहिंग्लजमध्ये पोस्ट कोविड सेंटरची गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
प्रसंगी कर्ज काढू, पण बळीराजाला मदत करू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 6:18 PM
coronavirus, gadhinglaj, Hasan Mushrif , kolhapurnews कोरोनामुळे राज्य आर्थिक अडचणीत असतानाही महाराष्ट्राला जीएसटीची रक्कम द्यायला केंद्र सरकार तयार नाही.त्यामुळे प्रसंगी कर्ज काढू, पण नैसर्गिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदत करू, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिला.
ठळक मुद्देप्रसंगी कर्ज काढू, पण बळीराजाला मदत करू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफगडहिंग्लज येथील बैठकीत पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे दिले आदेश