इचलकरंजी : कापड उत्पादक व व्यापाऱ्यांना स्थानिक वाहतुकीसाठी अडचणीचे ठरत असलेल्या ई - वे बिलासंदर्भात आठवड्याभरात अर्थखात्याचे प्रभारी मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन खासदार राजू शेट्टी यांनी दिले.शहर व आसपासच्या ३० किलोमीटर परिसरामध्ये यंत्रमाग कापड उत्पादन करणारे कारखाने आहेत. या परिसरामध्ये कापडाच्या गाठी ने-आण करण्यासंदर्भात ई-वे बिल अडचणीचे ठरत आहे, असे साकडे इचलकरंजीतील अडत व्यापारी संघटनेने खासदार शेट्टी यांच्याकडे घातले. याबाबत खासदार शेट्टी यांनी निवेदन स्वीकारून व्यापारी संघटनेचे उगमचंद गांधी, घनश्याम इनानी, बाळू ओझा, कारखानदार बाळासाहेब कलागते, हरिश बोहरा, आदींशी चर्चा केली. त्यानंतर शेट्टी यांनी मंत्री गोयल यांच्याबरोबर बोलून तोडगा काढू, अशी ग्वाही दिली.मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठकइचलकरंजी परिसरातील यंत्रमाग कारखानदारांना वीज दराची सवलत आणि त्यांनी वित्तीय संस्थांमार्फत घेतलेल्या अर्थसाहाय्यावर पाच टक्के व्याजाची सूट शासनाने द्यावी, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही लवकरच बैठक लावण्यात येईल, असेही खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. कारखानदारांचे एक शिष्टमंडळ खासदार शेट्टी यांना भेटले असता त्यांच्याशी केलेल्या चर्चेत वीज दर सवलत व पाच टक्के व्याजात सूट मिळण्याची मागणी केली होती. त्यावेळी शेट्टी बोलत होते.
ई-वे बिलासंदर्भात मंत्र्यांशी चर्चा करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:57 AM