कोल्हापूर : आस्थापनांना परवाना नूतनीकरण करुन घेण्याची मुदत दिनांक ३० एप्रिलपर्यंत आहे. सध्या ९० टक्के आस्थापना बंद आहेत. त्यामुळे परवाना नूतनीकरण करुन घेणे शक्य नाही. त्यामुळे परवाना नूतनीकरणाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे गुरूवारी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील ‘ब्रेक द चेन’मुळे सध्या शहरातील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सोडून सर्व उद्योजक, व्यापाऱ्यांचे दैनंदिन व्यवहार पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे परवाना नूतनीकरण करणे शक्य नाही. परवाना नूतनीकरण मुदत संपल्यानंतर १५ टक्के आणि २० टक्के दंड आकारला जाईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाने सर्व व्यवसाय व उद्योग बंद असल्याने कोणताही दंड आकारण्यात येवू नये, अशी मागणी या निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, खजानिस हरीभाई पटेल, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडीया, संचालक प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, अजित कोठारी, आदी उपस्थित होते.
चौकट
अन्यथा, फायरसेस भरणार नाही
महापालिकेने व्यापारी, उद्योजकांना विश्वासात न घेता, चुकीच्या पद्धतीने फायरसेसमध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. ही वाढ चुकीची असल्याने ती तत्काळ मागे घ्यावी. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत व्यापारी, उद्योजक फायरसेस भरणार नाहीत, असे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.
फोटो (२२०४२०२१-कोल-चेंबर ऑफ कॉमर्स) : कोल्हापुरात गुरूवारी परवाना नूतनीकरण, फायरसेसबाबतच्या मागणीचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांना दिले. यावेळी संजय पाटील, हरीभाई पटेल, आदी उपस्थित होते.
===Photopath===
220421\22kol_1_22042021_5.jpg
===Caption===
फोटो (२२०४२०२१-कोल-चेंबर ऑफ कॉमर्स) : कोल्हापुरात गुरूवारी परवाना नूतनीकरण, फायरसेसबाबतच्या मागणीचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांना दिले. यावेळी शेजारी संजय पाटील, हरीभाई पटेल, आदी उपस्थित होते.