शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

आरागिरणीधारकांचे नियमानुसार परवाने : कोल्हापूर टिंबर व्यापारी असोसिएशन शुल्क बुडवण्याचा प्रश्र्नच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 10:51 PM

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने वनविभागाचे परवाने आॅनलाईन नूतनीकरण करण्याची कार्यपद्धती २५ फेब्रुवारी २०१४ पासून अवलंबली आहे;

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने वनविभागाचे परवाने आॅनलाईन नूतनीकरण करण्याची कार्यपद्धती २५ फेब्रुवारी २०१४ पासून अवलंबली आहे; पण त्यामुळे आरागिरण्या तपासणीबाबत कोणताही नियम शिथिल केलेला नाही. त्यामुळे सर्व आरागिरणीधारक कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही यासाठी नेहमीच सतर्क आहेत. आरागिरणीधारक त्यांना लागू असणारे सर्व परवाने घेतात, त्यामुळे शासनाचे कोणतेही शुल्क बुडवत नाहीत, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र टिंबर लघुउद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष व जिल्हा टिंबर संघाचे सरसचिव हरिभाई पटेल यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

केंद्रीय प्रदूषण महामंडळ, पर्यावरण व वनमंत्रालयाने देशातील सर्व राज्य प्रदूषण महामंडळांना, प्रदूषण नियंत्रण समित्यांना सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सॉ मिल (आरागिरणी) यांना ग्रीन कॅटॅगरीमध्ये दाखल करून आवश्यक ते संमतीपत्र  महाराष्ट्र   प्रदूषण महामंडळाकडून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व आरागिरणीधारकांची शिखर संघटना महाराष्ट्र टिंबर लघुउद्योग महासंघ, ठाणे-मुंबई यांनी राज्यातील संघटनांना तात्काळ संमतीपत्र घेण्याचे कळविले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्'ातील आरागिरणी संघटना, कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी व लघु औद्योगिक संघ, सर्व आरागिरणीधारकांना संमतीपत्र घेण्याबाबत कळविले होते. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज केले जात आहेत. दरम्यान, आॅनलाईन अर्ज करीत असताना शासनाच्या मैत्री व प्रदूषण महामंडळाच्या दोन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करावा लागत असल्याने अर्ज करण्यास विलंब होत असल्याचेही हरिभाई पटेल यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.