भरत बुटाले ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘महापुरानं आमचं लई नुकसान केलंया. घरंच्या घरं आणि शेतंबी पाण्याखाली हाईत. त्यांची अवस्था काय झाली आसल माहीत नाही. गेल्या रविवारी आमी इथं आलुया. इथं ºहाण्या-जेवणाची चांगली सोय झालीया, पर घराकडं कधी जाईन आसं झालंय.’ घालवाडच्या बेबी जाधव उदास चेहऱ्याने आपली व्यथा मांडत होत्या.‘इथं आमच्या चहा, नाष्टा, जेवण तसेच राहणे आणि औषधाची चांगली व्यवस्था झाली आहे. मागं आमच्या घराचं काय झालं माहीत नाही. तीच चिंता लागलीय. आम्ही पूर ओसरायची वाट पाहात आहोत.’ अर्जुनवाडच्या रेखा पांढरे बोलताना भाऊक झाल्या होत्या. अर्जुनवाडच्या ललिता ढाले, शिरोळच्या कांचन पांढरे आदी पूरग्रस्त महिलांनीही ‘लोकमत’च्या प्रतिनिधीकडे रविवारी आपले मन मोकळे केले.मदतीचा हातपूरग्रस्तांना बाहेरगावाहूनही मदतीचा ओघ सुरू आहे. अनेक संस्था, मंडळे पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी धडपडत आहेत. यड्रावच्या शरद इन्स्टिट्यूटचे १२ विद्यार्थी येथे मदतकार्यात सहभागी झालेआहेत.आपत्ती निवारण टीम शिरोळमध्येमुंबई आणि पुणे येथील आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन संस्थेची टीम शिरोळमधील आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावली आहे. शनिवारी ही टीम येथे अन्नाच्या पाकिटांसह दाखल झाली असून, त्यात दोन महिलांसह २६ जणांचा समावेश आहे. ते आता रेस्क्यु आॅपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत.या टीममध्ये दोघा डॉक्टरांचाही समावेश आहे. ही संस्था स्वखर्चाने मदतीचा हात देते. ही माहिती निलेश संबूस आणि बिमल नथवाणी यांनी दिली.
लई नुकसान झालं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:06 AM