शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

मृत्यूनंतरचे जीवन - अवयव दान

By admin | Published: October 20, 2016 1:07 AM

एक वेगळा आदर्श : सरुडकर कुटुंबीय व अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलच्या प्रयत्नांनी अवयव दान

कोल्हापूर : अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉ. संतोष सरुडकर, रणजित कांबळे-सरुडकर, तेजस्विनी भूषण म्हेत्रे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या अवयवांचे दान केल्याने सरुडकर कुटुंबीय व अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलने पाचजणांना अवयव दान दिले आणि एक वेगळा आदर्श निर्माण केला. सरुडकर कुटुंबीयांनी दसऱ्या दिवशी अमूल्य असे अवयव स्वरूपी सोने वाटले व पाच कुटुंबांच्या जीवनात खरी विजयादशमी साजरी करण्याची संधी दिली.दसऱ्या दिवशी म्हणजे शासकीय सुटीदिवशी हा निर्णय अमलात आणायचा असल्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी होत्या; पण कसोशीने प्रयत्न करून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि अवयव गरजू रुग्णांपर्यंत वेळेत पोहोचविण्यात आले. डॉ. सरुडकर हे नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये आपल्या कामात मग्न असताना अचानक त्यांना फोन आला की, तुमच्या आईचा उजवा पाय आणि उजवा हात हलत नाही. त्यांच्या आर्इंना तातडीने हॉस्पिटलमध्ये आणण्याची व्यवस्था करण्यात आली. ‘गोल्डन अवर’मध्ये म्हणजे तासाच्या आत त्यांना हॉस्पिटलमध्ये आणले आणि सीटी स्कॅन केले, तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी असल्याचे स्पष्ट झाले. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. स्नेहलदत्ता खाडे यांनी तत्काळ थ्रोम्बोलिसिस करण्याचा निर्णय घेतला. न्यूरो सर्जननी मेंदूवर सर्जरीसुद्धा केली; पण दैवाची साथ मिळाली नाही. अखेर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, यापुढे काहीही उपचार शक्य नाही आणि त्यांचा मेंदू मृतवत झाल्याने मरणाला सामोरे जाणे अटळ आहे. एकदा ही बाब स्पष्ट झाल्यावर आपल्या आईच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. प्रमुख अडचण होती ती कोल्हापूर येथे ‘आॅर्गन हार्वेस्टिंग’च्या परवानगीची. ती नसल्यामुळे अवयव दान अशक्य वाटत होते.डॉ. उल्हास दामले यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव प्रत्यारोपण समन्वयक डॉ. अनिकेत सूर्यवंशी व युवराज पाटील यांनी या बिकट कार्याची सुरुवात केली. डॉ. आरती गोखले यांच्याशी (ेळउउ, ढ४ल्ली) संपर्क झाला आणि याबाबत माहितीचा पाठपुरावा सुरू केला. डॉ. गौरी राठोड व डॉ. विजय वाघ (ऊऌर) डॉ. प्रवीण शिंगारे (ऊटएफ) यांनी ‘विशेष परवानगी’ देण्याचा चाकोरीबाहेरचा निर्णय तत्काळ घेतला व इ-मेलने परवानगी दिली. सुटीदिवशी शासकीय यंत्रणेशी संवाद साधणे थोडे अवघड असते; पण यावेळी अत्यंत वेगळा अनुभव आला. प्रतिसाद मिळाला व अशक्य वाटणारे कार्य शक्य झाले.रात्री साडेनऊ वाजता पुण्याहून आलेले डॉ. गौरव गुप्ता, डॉ. अभिजित माने आणि अ‍ॅस्टर आधार येथील किडनीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण घुले व युरॉलॉजिस्ट डॉ. अमोल मुतकेकर यांनी रात्री दोन वाजेपर्यंत ही सर्जरी केली व पेशंटची मूत्रपिंडे आणि लिव्हर तातडीने पुण्याला पाठविण्यात आले. तेथील सह्णाद्री, जहॉँगीर, आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये लिव्हर, मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आणि नेत्रदानासाठी डॉ. सुजाता नवरे यांनी शस्त्रक्रिया केली व ते कोल्हापूरमधील पेशंटना देण्यात आले. अशाप्रकारे पाच व्यक्तींना अवयव दानाचा फायदा झाला. अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल प्रशासनानेही ज्यांच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग येतात, त्यांनी सरुडकर कुटुंबीयांप्रमाणे धैर्य दाखवून इतरांना जीवनदान देण्यासाठी अवयव दानाचे पुण्यकर्म करावे, असे आवाहन केले आहे.मानवी शरीर हे क्षणभंगुर व नाशवंत आहे. मानवाच्या मृत्यूपश्चात त्याचे शरीरही नष्ट होते. आपल्या समाजात एकतर ते जाळून भस्म केले जाते किंवा जमिनीत गाडले जाते; पण अवयव दान करून या नश्वर शरीराचा आपण सदुपयोग करू शकतो व मृत्यूनंतरही अवयव रूपाने आपण आपली स्मृती अमर करू शकतो त्यासाठी गरज आहे भावनिकता बाजूला ठेवण्याची. हा वैचारिक बदल जर आपल्या मानसिकतेत आला तर नक्कीच कोल्हापूर विभागातून अनेक रुग्णांना आपण मदत करू शकतो. हृदय, फुप्फुस, किडनी, लिव्हर, अस्थी, त्वचा, पॅनक्रियास, इत्यादी अवयव आपण दान करू शकतो, अशी माहिती डॉक्टर दामले यांनी दिली.अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलने अवयव दान स्वीकारण्याची कायमस्वरूपी परवानगी मिळावी, यासाठी याआधीच प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि नजीकच्या काळातच अशी परवानगी हॉस्पिटलला मिळेल, अशी अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल प्रशासनाची अपेक्षा आहे. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सर्व यंत्र व साधनसामग्रीनेही हॉस्पिटल सुसज्ज आहे. या पार्श्वभूमीवर अवयव दान स्वीकारण्याच्या परवानगीबरोबरच अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्येअवयव प्रत्यारोपणासाठी गरजेनुसार बाहेरून तज्ज्ञ डॉक्टरना बोलाविणेही शक्य आहे.