शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

जीवनदायी सत्त्वे

By admin | Published: October 28, 2015 11:04 PM

सिटी टॉक

‘डॉक्टरांनी बाकीच्या औषधांबरोबर आम्हाला व्हिटॅमिनच्या गोळ्या पण लिहून दिल्या आहेत. त्या घेतल्या नाहीत तर चालतील का?’ अशा प्रकारची चौकशी करण्यासाठी मला महिन्यातून चार ते पाच तरी फोन येतात. या गोळ्या घेण्याची अजिबात इच्छा नसणारेही लोक असतात. तसेच आयुष्यभरासाठी व्हिटॅमिनच्या गोळ्या मागणारेही लोक असतात. आज आपण याच विषयावर विचार करू. व्हिटॅमिन म्हणजेच जीवनसत्त्वे. जीवनसत्त्वांचे ढोबळमानाने दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारातील जीनवसत्त्वे ही पाण्यात विरघळणारी असतात व सुलभतेने शरीरात शोषली जातात. उदाहरणार्थ ‘ब’ आणि ‘क‘ जीवनसत्त्वे तर दुसऱ्या प्रकारच्या जीवनसत्त्वांचे शोषण होण्यासाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. या प्रकारामध्ये अ,ड,ई,के या जीवनसत्त्वांचा समावेश होतो. प्रत्येक जीवनसत्त्वांचे शरीरातील कार्य वेगवेगळे असते. जरी या अन्नघटकांपासून ऊर्जा मिळत नसली, तरी येणाऱ्या ऊर्जेचे योग्य नियोजन करण्याचे काम जीवनसत्त्वे करीत असतात. टप्प्याटप्प्याने प्रत्येक जीनवसत्त्वाबाबत विचार करू.यापैकी ‘ब’ जीवनसत्त्व हा एक समूह आहे. ज्यामध्ये आठ निरनिराळ्या घटकांचा समावेश होतो. थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन, पँटोथेनिक अ‍ॅसिड, पायरिडॉक्सिन, बायोटीन, फोलिक अ‍ॅसिड व कोबालामाईन अशी आठ घटकांची नावे आहेत. यातील काही घटक चयापचन क्रियांमध्ये भाग घेतात. काही पचनक्रियेमध्ये मदत करतात. मेंदूपासून निघणाऱ्या नसांची कार्यक्षमता सुधारणे, नैराश्यापासून संरक्षण देणे, कर्बोदांचे शोषण करणे, अशा अनेक कामांसाठी ‘ब’ जीनवसत्त्व समूहाची गरज असते. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, धान्ये, सुका मेवा या अन्नपदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात ‘ब’ जीवनसत्त्व आढळून येते. अनेकदा लोक म्हणतात की, आम्ही भरपूर भाज्या खातो. तरीही ‘ब‘ जीवनसत्त्वाची रक्तात कमतरता आहे. याचे कारण या समूहातील शेवटचा घटक हा कोबालामाईन (बी-१२) हा प्रामुख्याने मांसाहारात आढळून येतो. त्यामुळे शाकाहारी लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. दही आणि चीज या पदार्थांमध्ये कोबालामाईन असते. कारण दूध आंबविणे या प्रक्रियेत कोबालामाईन निर्मिती होते. आहारामध्ये ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास डोळ्यांचा दाह होणे, जीभेचे अल्सर होणे, ओठांच्या त्वचेला तडे पडणे, भूक कमी होणे, स्नायू अशक्त होणे, झोपेच्या तक्रारी, पायामधून मुंग्या येणे, अशी लक्षणे दिसतात. ही कमतरता वेळीच भरून न काढल्यास रक्तक्षय, सांध्यांचा कठीणपणा, कायमस्वरूपी नसा खराब होणे, अशा तक्रारी होऊ शकतात. पाण्यात विरघळणारे दुसरे जीवनसत्त्व म्हणजे ‘क’ जीवनसत्त्व. आपल्या हाडाच्या पेशी बनविणे, कोलॅजेनची निर्मिती करणे, हार्मोन्स तयार करणे, फुप्फुसांचे कार्य सुधारणे या कामांसाठी ‘क’ जीवनसत्त्वाची गरज असते. ही गरज आहारातून पूर्ण न झाल्यास हिरड्यांमधून रक्त येणे, थकवा वाटणे, जखमा लवकर न भरण, हाडांमध्ये ताकद नसणे, अशी लक्षणे दिसू शकतात. संत्री, मोसंबी, पेरू, आवळा, सफरचंद, लिंबू अशा फळांमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. मात्र, भाज्या अतिप्रमाणात शिजविणे, फळे कापून उघडी ठेवणे यामुळे त्यातील ‘क’ जीवनसत्त्वांचा नाश होतो.‘ब’ आणि ‘क’ ही दोन्ही जीवनसत्त्वे शरीरात साठविली जात नाहीत. त्यामुळे रोजच्या रोज आहारात त्यांचा समावेश करणे श्रेयस्कर. शिल्पा जाधव- लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.