कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०.३ मिली मीटर पावसाची नोंद झाली.गेली चार दिवस पावसाने उसंत घेतली आहे. कडकडीत ऊन राहिल्याने शेतीच्या कामांना काहीसा वेग आला आहे. बुधवारी सकाळ पासून ढगाळ वातावरण राहिले. जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असून राधानगरी धरणातून मात्र अद्याप वीज निर्मितीसाठी प्रतिसेंकद १३०० घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु आहे.बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस असा-शाहुवाडी -१.७, गगनबावडा -१०.३, करवीर - १.२, कागल - ०.४, गडहिंग्लज - ०.२, भुदरगड - ०.१. इतर तालुक्यात पावसाची पुर्णपणे उघडीप राहिली.
कोल्हापूरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:16 IST
Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०.३ मिली मीटर पावसाची नोंद झाली.
कोल्हापूरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी
ठळक मुद्देकोल्हापूरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरीगगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०.३ मिली मीटर पावसाची नोंद