गडहिंग्लज : लिंगायत धर्माला शासन मान्यता देत नाही. त्याविरोधात आपल्या धर्मास शासनाकडून संविधानिक मान्यता मिळवण्यासाठी शासनविरोधात कायदेशीर व सनदशीर मार्गाने लढा उभा केला जाईल, या लढ्यामध्ये युवक व महिलांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन लिंगायत धर्म महासभेचे राज्य सरचिटणीस बी. एस. पाटील यांनी केले. गडहिंग्लज तालुका लिंगायत धर्म महासभेतर्फे आयोजित लिंगायत समाजबांधवांच्या सभेत व मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे होत्या. रत्नमाला घाळी यांची प्रमुख उपस्थिती होती. महासभेचे जिल्हाध्यक्ष राजू पिंपळे म्हणाले, लिंगायत धर्माच्या प्रचारासाठी तरुणांनी सक्रिय राहून गावोगावी लिंगायत महासभेच्या शाखा स्थापन कराव्यात. डॉ. सूर्यकांत घुगरे म्हणाले, लिंगायत धर्म परिपूर्ण आहे. त्यासाठी शास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आधार घेता येईल, याचे विवेचन करून धर्म व अल्पसंख्याक कशाला म्हणतात याच्या व्याख्या देऊन सविस्तर वर्णन केले. प्रा. अॅड. एस. एम. पाटील म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्याचे वर्णन करून कायदेशीर मार्गाने धर्मास मान्यता व अल्पसंख्याक दर्जा कसा प्राप्त करून घेता येईल, याचे मार्गदर्शन केले. महासभेचे तालुकाध्यक्ष प्राचार्य विनोद नाईकवाडी यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. लिंगायत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती डॉ. किरण हत्ती, डॉ. सतीश घाळी, बी. एन. पाटील, नगराध्यक्षा घुगरी, उपनगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, बी. बी. पाटील, सुमित्रा मडलगी, डॉ. सूर्यकांत घुगरे, राजू पिंपळे, दुंडाप्पा जमदाडे, कृष्णाप्पाण्णा मुसळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाबळेश्वर चौगुले, प्राचार्य मंगलकुमार पाटील, आय. जी. फुटाणे, राजशेखर दड्डी, बाबूराव पाटील, डॉ. कुरबेट्टी, राजू खमलेहट्टी, भ. क. पाटील, महारूद्र हिरेमठ, सिद्धाण्णा देसाई, कल्लाप्पा देसाई, रामगोंडा पाटील, भीमाप्पा मास्तोळी, राम मजगी, कल्लाप्पा हत्तरकी, शंकर मोर्ती, कलगोंडा पाटील, जिल्हा प्रतिनिधी महादेव कोले, महादेव मुसळे, निरंजन पाटील, चनबसाप्पा बंदी, आदी मान्यवर उपस्थित होते. दत्ता मगदूम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) गडहिंग्लज येथील लिंगायत समाजाच्या सभेत बोलताना विनोद नाईकवाडी. डावीकडून डॉ. सूर्यकांत घुगरे, राजू पिंपळे, बी. एस. पाटील, रत्नमाला घाळी, लक्ष्मी घुगरे, कावेरी चौगुले, एस. एम. पाटील, बी. एन. पाटील, आदी.
लिंगायत धर्म मान्यतेसाठी लढा देऊ बी. एस. पाटील :
By admin | Published: November 19, 2014 10:50 PM