बोरवडे : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याने कालव्यातील पाणी झिरपून शेतात जात असल्याने जमिनी क्षारपड होत आहेत. अस्तरीकरणातील गळती त्वरित रोखावी, अशी मागणी बोरवडे येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागास दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेली ३० ते ३५ वर्षे विना प्लास्टर उजव्या कालव्यातून पाणी सोडले जात होते. त्यामुळे जमिनी क्षारपड व नापिक झाल्या. सध्या संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण झाले असून निकृष्ट कामामुळे पूर्वीप्रमाणे शेतीमध्ये पाणी मिसळत असल्याने जमिनी खराब होत आहेत. अस्तरीकरणामुळे पाण्याची गळती थांबेल असे वाटत होते; पण शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. अस्तरीकरणानंतर एक महिन्याच्या आतच पूर्वीप्रमाणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी तुंबून शेती खराब होत आहे.
चौकट करणे :
‘काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम दर्जेदार झाले असून शेतकऱ्यांनी हे काम निकृष्ट झाल्याचा केलेला आरोप चुकीचा असून ज्या ठिकाणी जॉईंटमधून पाणी मुरते त्याची दुरुस्ती तत्काळ केली जाईल.’
- अजिंक्य पाटील,
डेप्युटी इंजिनिअर, कोल्हापूर. फोटो ओळी - बोरवडे (ता. कागल) येथील उजव्या कॅनॉलमधून पाणी झिरपत आहे.