शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

माणुसकीचा दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:07 AM

कोल्हापूर शहराला सामाजिक प्रबोधनाची आणि सेवेची फार मोठी परंपरा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही परंपरा आजही तितक्याच जोमाने पुढे नेली जात आहे. नव्या पिढीचा प्रयत्न अतिशय चांगला आणि इतरांनी प्रेरणा देणारा नक्कीच आहे. समाजात जितके गरजवंत आहेत, त्याच्या कितीतरी पटीने या गरजवंतांना मदत करणारे दानशूर आहेत. फक्त समाजाची गरज ओळखून ...

कोल्हापूर शहराला सामाजिक प्रबोधनाची आणि सेवेची फार मोठी परंपरा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही परंपरा आजही तितक्याच जोमाने पुढे नेली जात आहे. नव्या पिढीचा प्रयत्न अतिशय चांगला आणि इतरांनी प्रेरणा देणारा नक्कीच आहे. समाजात जितके गरजवंत आहेत, त्याच्या कितीतरी पटीने या गरजवंतांना मदत करणारे दानशूर आहेत. फक्त समाजाची गरज ओळखून मदत गोळा करणाºया आणि गोळा झालेली मदत गरजवंतांपर्यंत पोहोचविणाºया कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. ती आपल्याकडे कमी नाही. अनेक ग्रुप, संस्था, संघटना अशा प्रकारची कामे करत आहेत. त्यामुळे गरजू लोकांपर्यंत योग्य मदत मिळते आणि मनस्वी आनंदही मिळतो. हिंदू धर्मातील दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या आनंदात उपेक्षित, गोरगरिबांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न कोल्हापुरात झाला, आजही होताना पाहायला मिळतो.दिवाळीला नवीन कपडे आणि खमंग फराळ या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच सर्वत्र उत्साही, आनंदी वातावरण निर्माण झालेले असते. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी साजरी करतात; परंतु ज्यांची ऐपत नाही असाही एक घटक समाजात आहे. अशा उपेक्षित, गोरगरिबांना दिवाळाची आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमातून गेल्या दोन वर्षांपासून होत आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष होते. गतवर्षीपेक्षा यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद देणाºयांकडून मिळाला तसा तो घेणाºयांकडूनही मिळाला. त्यामुळे ज्या उद्देशाने हा उपक्रम सुरू झाला, तो यशस्वी ठरला असे मानायला काहीच हरकत नाही. आमदार सतेज पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांच्या पुढाकारातून या उपक्रमास एक लाखावर कपडे मिळाले, त्याचे वितरणही गरजूपर्यंत झाले. या उपक्रमाची दखल अन्य जिल्ह्यांत घेऊन तेथेही असे उपक्रम सुरू झाले आहेत हे या कार्याची पोहोचपावतीच म्हणावी लागेल.खरंतर अशाप्रकारचा उपक्रम गेल्या सात-आठ वर्षांपासून कोल्हापुरात सुरू आहे. जुने कपडे घेऊन ती बाबा आमटे यांच्या ‘आनंदवन’ आश्रमाकडे पाठविण्याचा उपक्रम महालक्ष्मी अ‍ॅपरल्सचे रवींद्र ओबेरॉय यांनी सुरू केला. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळत होता. चांगल्या सुस्थितील इस्त्री केलेले कपडे दिवाळीत गोळा करून ओबेरॉय स्वत: ‘आनंदवन’ला जाऊन हे कपडे गरीब, पीडितांना देत असत. या उपक्रमाससुद्धा समाजाने भरपूर प्रतिसाद दिला, अनेकांनी कौतुकही केले.कोल्हापूर शहरात एकीकडे ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी ‘आपुलकीची दिवाळी’ या उपक्रमाची यंदापासून सुरुवात केली. गोरगरिबांना फराळ वाटण्याचा हा उपक्रम आहे. ज्यांना दोनवेळच्या जेवणाची विवंचना आहे अशांना दिवाळीचे गोडधोड पदार्थ खायला मिळणे अवघडच. फराळ विकत घेऊन खाणे किंवा करून खाणं परवडणारे नाही. त्यांच्यासमोर ऐन दिवाळीत फराळासाठी भीक मागण्याची वेळ येत असते. या गोरगरिबांची गरज ओळखून आणि त्यांनाही दिवाळीचा आनंद द्विगुणित करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू झाला. त्यालाही यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. समाजात अशाप्रकारचे उपक्रम राबविणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. सगळ्याच उपक्रमांना प्रसिद्धी मिळते असं काही नाही. जे वृत्तपत्र कार्यालयापर्यंत पोहोचतात, त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळते; परंतु समाजात असेही काही अवलिया आहेत की गोरगरिबांना एका हाताने केलेली मदत ही दुसºया हाताला कळता कामा नये, असे मानणाºयांपैकी आहेत. गरजूंना केलेल्या मदतीची ही मंडळी कधीही कुठेही वाच्यता करत नाहीत. अगदी नि:स्वार्थी वृत्तीने, कशाचीही अपेक्षा न ठेवता स्वकमाईतून मदत करत राहतात म्हणूनच त्यांचेसुद्धा सामाजिक काम कौतुकास्पद आहे. - भारत चव्हाण