शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

‘उत्तर-दक्षिण’ सुभ्यात ‘ताराराणी’च्याही जोडण्या

By admin | Published: May 15, 2015 12:09 AM

महापालिका निवडणूक : काँग्रेसला बड्या नेत्यांतील अंतर्गत लाथाळ्यांचे ग्रहण; महाडिक कॉँग्रेसच्या परिघाबाहेरच

संतोष पाटील - कोल्हापूर -राष्ट्रीय काँग्रेसने कोल्हापूर महापालिका निवडणूक पक्षीय स्तरावर लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्ह्यातील कॉँग्रेस नेत्यांतील राजकीय सख्य जगजाहीर आहे. उत्तर व दक्षिण शहर विधानसभा मतदारसंघनिहाय विभागणी करून उमेदवारी वाटपाचे अधिकार ज्या-त्या नेत्यांना दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील कॉँग्रेसचे एकमेव आमदार महादेवराव महाडिक हे या सर्व प्रक्रियेपासूनच बाजूला असल्याने ‘ताराराणी आघाडी’ पुन्हा ताकदीने कामाला लागणार आहे. कॉँग्रेस कार्यकर्त्यांना उमेदवारीपेक्षा ऐन निवडणुकीत पक्षांतर्गत उडणाऱ्या या लाथाळ्यांची खरी भीती वाटत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा मुहूर्त कॉँग्रेसने ठरविला असला तरी नेत्यांची सोयरीक जुळून येणार काय, हा खरा औत्सुक्याचा विषय आहे. महापालिकेच्या आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखालील पी. एन. पाटील, सतेज पाटील, मालोजीराजे, सत्यजित कदम यांच्या समितीमार्फत उमेदवार निवडीसह प्रचार यंत्रणा राबविली जाणार आहे. वरवर पाहता ही समिती एकसंध दिसते; पण प्रत्यक्षात चौघाही नेत्यांचे वेगळे सुभे आहेत. कॉँग्रेसच्या या निवडणूक प्रक्रियेच्या परिघाबाहेर असलेल्या आमदार महादेवराव महाडिक यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी ‘ताराराणी आघाडी’ची जोडणी सुरू केली आहे. त्यामुळे कॉँग्रेसमध्ये एकवेळ तिकीट वाटपावेळी गदारोळ होणार नाही. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीवेळी कुरघोडीच्या राजकारणाला अधिक ऊत येण्याची शक्यता आहे.माजी मंत्री पाटील यांना गत निवडणुकीप्रमाणे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील २२ ते २५ व कसबा बावडा परिसरातील सहा अशा ३० हून अधिक प्रभागांतील उमेदवार निवडण्यापासून निवडून आणण्यापर्यंतची सर्व जबाबदारी दिली जाणार आहे. उर्वरित उत्तर मतदारसंघातील ४५ ते ५० उमेदवारीचे कॉँग्रेस व ताराराणी आघाडीच्या सोयीनुसारच वाटप होण्याची शक्यता अधिक आहे. याही निवडणुकीत महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी किनार असणार आहे. सतेज पाटील यांना १५पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून द्यायचा नाही, अशी व्यूहरचना ‘कारभारी’ म्हणवणाऱ्यांनी केली आहे; तर पाटील यांनीही हा डाव उलटविण्याची पुरेपूर तयारी केली आहे. कॉँग्रेस विरुद्ध इतर पक्ष यापेक्षा पहिल्या टप्प्यात ‘कॉँग्रेस विरुद्ध कॉँग्रेस’ अशीच ही निवडणूक होणार आहे. या नेत्यांनी एकजुटीने निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे आश्वासन दिले असले तरी अंतर्गत गटबाजीने एकमेकांच्या पायात पाय घालण्याचेच प्रकार अधिक होणार, हे निश्चित आहे. नेते म्हणतात...कॉँग्रेसअंतर्गत असलेल्या गटबाजीबाबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे अंतर्गत लाथाळ्यांबाबत वरिष्ठ स्तरावरच उतारा काढला जाईल. सर्व घटकांना सोबत घेऊनच कॉँग्रेस निवडणुक ीला सामोरे जाईल. कॉँग्रेस एकजुटीनेच सामोरी जाईल. - पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष कॉँग्रेसनिवडणुकीपूर्वी व नंतरही सर्व काही व्यवस्थित होईल, अशी आशा आहे. कॉँग्रेसला महापालिका निवडणुकीत मोठी संधी आहे. सर्वांनीच पक्षांतर्गत असलेली गटबाजी बाजूला ठेवून एकदिलाने निवडणुकीस सामोरे गेल्यास कॉँग्रेसची महापालिकेवर सत्ता येण्यास काहीच अडचण नाही. - सतेज पाटील, माजी मंत्री कॉँग्रेसमध्ये गटतट आहेत. प्रत्येक गट प्रबळ आहे. वरिष्ठांनी लक्ष घालून नेत्यांची एकमूठ बांधल्यास यश मिळविण्यात काहीच अडचण नाही. प्रत्येक नेत्याने हटवादी भूमिका बाजूला ठेवून व्यापक पक्षीय हितासाठी तडजोडीची भूमिका स्वीकारण्याची गरज आहे. - मालोजीराजे, माजी आमदार ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.’ मात्र, नेत्यांनी बोलण्याप्रमाणे वागले पाहिजे. पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण थांबविले नाही तर कॉँग्रेस शहरात जिवंत राहणार नाही. नेत्यांनी याबाबत विचार करूनच निर्णय घ्यावा. - सत्यजित कदम, नगरसेवकपक्षीय बलाबलपक्षसंख्याबळअपक्षकाँग्रेस३३०२राष्ट्रवादी२६०१शिवसेना-भाजप आघाडी०९०२जनसुराज्य आघाडी०९०५स्वीकृत - ०५१ महादेवराव महाडिक हे जिल्ह्यातील कॉँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था हा त्यांचा मतदारसंघ आहे. तरीही कॉँग्रेसच्या निवडणूक तयारीच्या प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग अद्याप दिसत नाही. याबाबत प्रतिक्रियेसाठी महाडिक उपलब्ध झाले नाहीत. महाडिक हे स्वत:हून प्रक्रियेच्या बाहेर आहेत की त्यांना विधानसभा मतदारसंघ रचनेनुसार नेतृत्व हे पक्षाचे धोरण म्हणून बाजूला ठेवले याबाबत मतांतरे आहेत. महाडिक रिंंगणातून बाजूला थांबल्यास कॉँग्रेसला डोकेदुखी ठरणाऱ्या ताराराणी आघाडीला बळ मिळणार असल्याची चर्चा आहे.२ कॉँग्रेसने शहरातील सर्व ७७ प्रभागांत २०१० साली निवडणूक लढविली होती. यातील ३१ जागांवर एकहाती विजय मिळविला; तर आठहून अधिक उमेदवार निसटत्या फरकाने विजयी झाले. ऐनवेळी पडद्यामागे दगाफटका झाल्याने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्याच्या मनसुब्यावर पाणी पडले होते. याचीच पुन्हा पुनरावृत्ती होईल, अशी धास्ती कार्यकर्त्यांना आहे.