(फोटो)
अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : वस्त्रनगरीत २०२० सालामध्ये ‘थोडी खुशी, जादा गम’ अशी परिस्थिती राहिली. कोरोनामुळे वस्त्रोद्योगासह अन्य सर्वच उद्योगधंदे, व्यवसाय बंद राहिले. त्यामुळे आर्थिक उलाढालही ठप्प झाली होती. या नुकसानामुळे अनेकांचे उद्योग बंद पडले, नोकरी गेली तर काहींनी नवीन उद्योगधंदे सुरू केले. शहरातील नेहमी गजबजलेले मुख्य चौक, रस्ते, बाजार याकाळात ओस पडले होते.
याउलट वस्त्रोद्योगामुळे शहरातील हवेत व पाण्यात होणारे प्रदूषण थांबले. परिणामी शहरवासियांना शुद्ध हवा व स्वच्छ पाणी मिळत होते. मंदीत संधी शोधत येथील काही वस्त्रोद्योजकांनी मास्क, पीपीई किट, मेडिकल अॅपरन, बेडसाठी लागणारे कापड (बेडशीट), रुग्णालयातील पडदे अशी अनेक उत्पादने घेऊन आपला व्यवसाय टिकवला. त्यातून अनेकांना लॉकडाऊन काळातही रोजगार मिळाला. सोशल डिस्टन्ससह शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळत व्यावसायिकांनी उत्पादन व त्याची डिलिव्हरी सुरक्षितपणे केली. देशातील अनेक राज्यांमध्ये येथील उत्पादनांची विक्री झाली असली, तरी पुन्हा असे संकट कधीही येऊ नये, अशीच प्रार्थना सर्वस्तरातून होत आहे.
(फोटो ओळी)
३०१२२०२०-आयसीएच-०३
३०१२२०२०-आयसीएच-०४
इचलकरंजीत उत्पादित झालेले मास्क.
३०१२२०२०-आयसीएच-०५
इचलकरंजी शहरात उत्पादित झालेले पीपीई किट.
३०१२२०२०-आयसीएच-०६
इचलकरंजी शहरात पीपीई किटचे उत्पादन.
३०१२२०२०-आयसीएच-०७
लॉकडाऊन काळात के. एल. मलाबादे चौक ओस पडला होता.
३०१२२०२०-आयसीएच-०८
इचलकरंजी-कोल्हापूर मार्ग लॉकडाऊनमुळे ओस पडला होता.
(सर्व छाया-संग्रहीत)