कोल्हापूर : गोकुळ शिरगांव परिसरातील स्थानिक खोकीधारकांवर करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे या युवकांचा रोजगार थांबला आहे. तरी त्यांना अटी शर्ती घालून व्यवसायास परवानगी देण्यात यावी अशी मागणी बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी व्यवसाय आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. खोकी धारकांच्या एकजुटीचा विजय असो, प्रशासनाचा धिक्कार असो. हटाव हटाव परप्रांतीय युवक हटाव अशा घोषणा देण्यात आल्या.व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक ८० टक्के युवकांना रोजगारीचा कायदा असूनही गोशिमा परिसरात हजारोंच्या संख्येने परप्रांतीय उत्तर प्रदेशातील युवक नोकरीस आहेत. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार नाही. ते खोकी टाकून आपला उदरनिर्वाह करत आहेत. हे खोकी धारक साधारणत: ५० ते ६० संख्येचे असताना जाणुनबुजून दोनशेच्या वर संख्या सांगण्यात आली.
अतिक्रमण कारवाईमुळे गेली २० ते २५ दिवस खोकी धारकांच्या कुटूंबांचा उदरनिर्वाह थांबला आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना येत्या दोन दिवसांत त्यांचा व्यवसाय पूर्ववत अटी शर्थी घालून सुरू करण्यास परवानगी दयावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा यावेळी देण्यात आला. या व अनेक घोषणांनी आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडण्यात आल.या निर्दशनावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, शिवसेना वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष सतीश माळगे, दत्ता मिसाळ, प्रदीप ढाले, शिवसेना तालुका उपाध्यक्ष भगवान कदम, आनंदराव माळी, रमजान मकानदार, आण्णा तिळवे, राज मकानदार, दयानंद शिंदे, भिमराव खानविलकर, संतोष जाधव, महंमद शेख, बबलु शेख, शंकर खोत, शिवाजी मगदूम, अमोल पाटील, श्रीकांत वंदूरे पाटील, राज मकानदार, जीवन कांबळे, राजाराम ढाले, अजित भोसले, संजय जाधव, भारती गजबर, कमलकांबळे, शालाबाई चौगुले, जयश्री मेदनरे, अर्चना खानविलकर, पूनम महागांवकर, छाया चव्हाण अन्य नागरीक उपस्थित होते.