शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाबळेश्वरमध्ये आढळला प्रदेशनिष्ठ 'क्रिकेट फ्रॉग', पश्चिम घाटाच्या जैवविविधतेमध्ये भर

By संदीप आडनाईक | Updated: February 27, 2025 12:37 IST

संशोधकांना बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध 

संदीप आडनाईककोल्हापूर : महाराष्ट्रातील उत्तर-पश्चिम घाटातील प्रेक्षणीय पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमधून बेडकाच्या नव्या प्रदेशनिष्ठ प्रजातीचा शोध लावण्यात भारतीय संशोधकांना यश मिळाले. ‘क्रिकेट फ्रॉग’ या सामान्य नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘मीनर्वारीया’ या कुळात नव्याने शोधलेल्या बेडकाचा समावेश केलेला आहे. कोल्हापूरचे सरिसृप तज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. हा शोधनिबंध ‘झूटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे.या प्रजातीच्या उत्तर-पश्चिमी घाटातील आढळक्षेत्रावरून तिचे नामकरण ‘घाटी’ या संस्कृत आणि ‘बोरियालिस’ या उत्तरेकडील क्षेत्र दर्शवणाऱ्या लॅटीन शब्दांवरून केलेले आहे. या संशोधनात मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे, प्राध्यापक डॉ. ओमकार यादव, प्रा. डॉ. अमृत भोसले, प्रा. डॉ. प्रियांका पाटील, ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक अक्षय खांडेकर आणि भारतीय प्राणी सर्वेक्षणचे संशोधक डॉ. के. पी. दिनेश यांचा सहभाग आहे. त्यांना तेजस ठाकरे यांचे सहकार्य लाभले.

रातकिड्यांसारखा काढतात आवाजमीनर्वारीया कुळातील बेडूक पोटावरील समांतर रेघांवरून इतर बेडकांहून वेगळे ठरतात. साठलेल्या पाण्याशेजारी किंवा छोट्या झऱ्यांच्या शेजारी बसून रातकिड्यांसारखा आवाज काढतात म्हणून त्यांना ‘क्रिकेट फ्रॉग’ म्हणतात. हे बेडूक महाबळेश्वरमधील कोळी आळीमधील एका खासगी वाहनतळामध्ये साठलेल्या पाण्याशेजारी आढळले.

वैशिष्ट्ये 

  • आकाराने ५.५ सेंमीपेक्षा मोठा
  • पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांपुरता मर्यादित प्रजनन काळ
  • आवाजामधील वेगळेपण आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय संच
  • निशाचर आणि इतर प्रजातींपासून वेगळी
  • छोटे कीटक हे मुख्य खाद्य

महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळी अशा प्रदेशनिष्ठ बेडकाच्या प्रजातीचा शोध लागणे ही बाब त्या प्रदेशातील नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. या भागात काम करण्यासाठी तरुण पिढी पुढे येत आहे, ही अगदीच आनंदाची गोष्ट आहे. - डॉ. के. पी. दिनेश, संशोधक, भारतीय प्राणी सर्वेक्षण 

हा शोध केवळ नवीन प्रजातीच्या यादीत एक नवीन नाव जोडण्यासाठी नाही; तर याने पश्चिम घाटाच्या जैवविविधतेच्या हॉटस्पॉटमध्ये चालू असलेल्या संरक्षण प्रयत्नांची गरज अधोरेखित केली आहे. - डॉ. ओमकार यादव, संशोधक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानenvironmentपर्यावरणResearchसंशोधन