शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

स्थानिक की उपरा उमेदवार याच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 4:23 AM

अमर पाटील : कळंबा शहराच्या दक्षिणेकडील पालिकेचे शेवटचे टोक म्हणजे प्रभाग ७९ सुर्वेनगर. गेल्या वीस वर्षांत चारही महानगरपालिका निवडणुकीत ...

अमर पाटील : कळंबा

शहराच्या दक्षिणेकडील पालिकेचे शेवटचे टोक म्हणजे प्रभाग ७९ सुर्वेनगर. गेल्या वीस वर्षांत चारही महानगरपालिका निवडणुकीत या प्रभागाचे राजकारण विकासापेक्षा अर्थकेंद्रित झाले. परिणामी गेली वीस वर्षे स्थानिक प्रतिनिधीच प्रभागास मिळाला नाही. विकासाविना भकास प्रभागात यंदा मात्र विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक प्रतिनिधी निवडण्याचा चंग जनतेने बांधला आहे, पण नेत्यांच्या हट्टापुढे किती टिकणार हे काळच ठरविणार हे निश्चित.

गेल्या पाच वर्षांत प्रभागास मिळालेले प्रतिनिधी गुलजारबानू नगारजी, जयश्री माने, इंद्रजित सलगर, मेघा पाटील हे स्थानिक रहिवासी नव्हते. त्यामुळे मूलभूत समस्यांचा निपटारा आणि प्रतिनिधींच्या संपर्काअभावी जनतेस मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

गत निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा मेघा पाटील उभ्या राहिल्याने पक्षासाठी ही लढत मोठी प्रतिष्ठेची बनली होती. सर्वसाधारण कार्यकर्त्यास संधी देताना इच्छुकांच्या भाऊगर्दीतून उमेदवारी निवडताना येथे नेत्यांचा मोठा कस लागला होता. सर्व उमेदवार ताकदवान असल्याने येथे निकाल सांगणे अवघड बनले होते. शिवसेनेच्या उषा खतकर, काँग्रेसच्या अर्चना साळोखे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघा पाटील यांच्यात चुरशीची लढत होऊन अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघा पाटील विजयी झाल्या होत्या. त्यांच्या विजयामागे सर्वच पक्षांची छुपी ताकद कार्यरत होती.

पूर्वेस कळंबा रोड हद्द, पश्चिमेस प्रथमेशनगर, उत्तरेस मोरे माने नगर, दक्षिणेस नवनाथनगर अशा विस्तारलेल्या प्रभागात लहान-मोठ्या पंचवीस कॉलन्यांचा समावेश प्रभागात होतो. मध्यमवर्गीय नागरिकांच्या वस्तीचे प्राबल्य असणाऱ्या या प्रभागात बहुतांश नागरिक राधानगरी-भुदरगड तालुक्यातून रोजगार व्यवसाय, नोकरीनिमित्ताने रहिवासी बनल्याने हे निर्णायक मतदारांची भूमिका बजावतात. सुर्वेनगर, बापूरामनगर या दोन मोठ्या कॉलन्यांमधील मतदारांची भूमिका विजयी उमेदवार ठरवतात. येथे पक्षीय राजकारणापेक्षा पाटील-महाडिक गटाचे राजकारण मोठे चालते. गेली वीस वर्षे या मतदारसंघावर पाटील गटाचा अर्थात आमदार सतेज पाटील गटाचा वरचष्मा राहिला आहे हे वैशिष्ट्य.

म्हणजे पालिकेच्या सर्व मतदारसंघांपेक्षा जास्त प्रमाणात चुरशीने मतदान येथे होते. गतवेळी ५७२२ पैकी ४३१६ म्हणजे ७५ टक्के मतदान झाले होते.

आरक्षण सोडतीपूर्वी गेली सहा महिने पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी, स्वच्छता मोहीम, विविध शिबिरे, अनोळखी समस्या ओळखा स्पर्धा, पोस्टर वॉरने प्रभागाचे राजकारण ढवळून निघाले होते. प्रभाग खुला होईल या अपेक्षेने इच्छुक उमेदवारांची मांदियाळी जमली होती, परंतु अनुसूचित जाती पुरुष आरक्षण जाहीर होताच इच्छुकांच्या आनंदावर विरजण पडले.

विस्तारित प्रभागात स्टॉर्म वॉटर प्रकल्प न राबवल्याने, अंतर्गत रस्ते, गटारी विकसित न झाल्याने ऐन पावसाळ्यात निम्म्या प्रभागातील नागरी वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते. क्रीडांगण, सभागृहे, व्यायामशाळा, बगीचे, हॉस्पिटल, विरंगुळा केंद्र, वाचनालय यासाठी आरक्षित सर्वात जास्त खुल्या जागा प्रभागात असूनही या पालिका प्रशासनाने ताब्यात घेऊन विकसित न केल्याने बहुतांश आरक्षित जागा बळकावल्या गेल्या आहेत, हे विशेष. येथे कमी दाबाने होणारा अपुरा पाणीपुरवठा व स्वच्छतेचा कायम बोजवारा उडालेला दिसतो.

आरक्षण सोडतीपूर्वी खुल्या प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या खांद्यावर नेत्यांनी आर्थिक तगडा उमेदवार शोधमोहीम राबविण्याची जबाबदारी सोपवली आहे. यातून प्रभागात सुनील वर्मा, लखन चव्हाण, संजय सुदर्शनी, अभिजित वांद्रे, विजय कांबळे, अवि साठे, प्रकाश टोणपे, रामचंद्र भाले यांच्या नावाची चर्चा आहे. यातून पक्षांचा उमेदवार निवडताना मोठा कस लागणार आहे हे निश्चित आहे.

प्रभाग ७९ सुर्वेनगर

विद्यमान नगरसेविका मेघा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस

आताचे आरक्षण : अनुसूचित जाती पुरुष

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

मेघा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस १२८२

उषा खतकर शिवसेना १०६२

अर्चना साळोखे काँग्रेस १०१२

सुप्रिया वाडकर भाजप ८४

प्रतिक्रिया मेघा पाटील नगरसेविका

गेल्या पाच वर्षांत जवळपास अडीच कोटींची विकासकामे पूर्णत्वास नेली आहेत. अंतर्गत रस्ते, गटारी, कचरा उठावाची परिणामकारक कामे झाली असून पालिकेच्या खुल्या आरक्षित जागा विकसित केल्या आहेत. ड्रेनेजच्या कामासाठी खुदाई केलेले रस्ते विकसित करणे प्रलंबित आहे.

प्रभागातील सोडवलेले प्रश्न

* बापूरामनगरातील २५ वर्षे प्रलंबित असलेला अंतर्गत रस्ते, गटारीप्रश्न मार्गी लावला

* प्रभागातील ड्रेनेज लाईनचा बहुतांश प्रश्न मार्गी लावला.

* संपूर्ण प्रभागात एलईडी लाईट.

* प्रभागात संपर्क कार्यालय स्थापून नागरी प्रश्नांचे निराकरण

* पाच खुल्या आरक्षित जागांवर वाचनालय, सांस्कृतिक कार्यालय, ओपन जिम, बगीचा उभारणी

*पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अमृत योजनेअंतर्गत मार्गी

प्रभागातील समस्या

*प्रभागात सांडपाणी निर्गतीकरण करणाऱ्या गटारी विकसित नाहीत.

*कचरा उठावातील अनियमितता

*प्रभागात आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष

*मुख्य रस्त्यांसह कॉलनीअंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्याचे साम्राज्य

* पावसाळ्यात नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरते

*पिण्याच्या पाण्याची समस्या, कमी दाबाने पाणीपुरवठा

*खुल्या आरक्षित जागांचा बाजार विकसित न केल्याने बहुतांश लाटल्या

* लोकप्रतिनिधी जनसंपर्क अभाव

चौकटी

१) यंदाही उमेदवार स्थानिक की परका

गेल्या वीस वर्षांत स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभागास लाभला नाही हे दुर्दैव आहे. प्रत्येक निवडणुकीत स्थानिक उमेदवार उभा राहतात, परंतु आयत्यावेळी नेते बाहेरून उमेदवार आणून त्याला निवडून आणण्याची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांवर लादतात. यंदाही स्थानिक उमेदवारांनी कंबर कसली असली तरी परका उमेदवार आयत्यावेळी घोषित करण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फोटो मेल केला आहे

फोटो ओळ

सुर्वेनगर प्रभागाची मुख्य समस्या बहुतांश मुख्य रस्त्यासह कॉलनीअंतर्गत रस्ते विकसित करण्यात आले नाहीत.

रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य नित्याचे.