शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

corona virus --मुंबईतील म्हशींच्या तबेल्यांवर लॉकडाऊनची वेळ; चारा, खुराक महागले; तर दुधाचे भाव उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:23 PM

मुंबई आणि उपनगरात १०० ते ७००० जातिवंत म्हशी असणारे शेकडो तबेले आहेत. यासाठी आवश्यक असणारे मजूर हे बहुतेक बिहार येथील आहेत. तेही कोरोनाच्या भीतीने आपल्या गावी निघून गेलेत, तर काहीजण वाहनाची वाट पाहत आहे. त्यामुळे तबेला मालकावर टांगती तलवार असणार आहे.

ठळक मुद्दे कोरोना इफेक्ट

यशवंत गव्हाणे।कोल्हापूर : सकस आणि ताज्या दुधाच्या मागणीमुळे मुंबईसह उपनगरात शेकडो म्हशींचे तबेले वर्षांनुवर्षे सुरू आहेत. तबेल्यातून थेट ग्राहकांपर्यंत दूध अशी त्यांची नाळ आहे; परंतु आता याच भय्यांवर तबेलाच लॉकडाऊन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण एकच कोरोना व्हायरसमुळे देशात सुरू असलेले लॉकडाऊन. याचा परिणाम चारा, खुराकामध्ये पाच ते सात रुपये कृत्रिम भाव वाढ झाली आहे, तर दूध दर मात्र २० रुपयाने उतरुन ४० रु.लिटरवर आल्याने तबेलेवाले भय्या अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.

मुंबईतील जोगीश्वेरी, भिवंडी, कल्याण या भागात अनेक जातिवंत जाफराबादी म्हशींचे तबेले आहेत. येथील म्हशीला लागणारा चारा गुजरातसह राज्यातील नाशिक , पुणे, बीड, अमरावती, अहमदनगर, जळगाव, सोलापूर आदी ठिकाणांहून पुरविला जातो; परंतु वाहतूकव्यवस्था बंद असल्याने ट्रकमालक रिटर्न भाडे नसल्याने दुहेरी भाडे तबेल्यावाल्यांकडून घेत आहेत. त्याचा परिणाम असा झाला की, पूर्वी गवताच्या पेंडींचा ट्रक वीस हजाराला मिळत असे, त्याला तब्बल ४० ते ४५ हजार रुपय मोजावे लागत आहेत.मुंबई आणि उपनगरात १०० ते ७००० जातिवंत म्हशी असणारे शेकडो तबेले आहेत. यासाठी आवश्यक असणारे मजूर हे बहुतेक बिहार येथील आहेत. तेही कोरोनाच्या भीतीने आपल्या गावी निघून गेलेत, तर काहीजण वाहनाची वाट पाहत आहे. त्यामुळे तबेला मालकावर टांगती तलवार असणार आहे.

ऐन हंगामात नुकसानउन्हाळ्याचा कडाका वाढला की बाजारात दूध, दही, ताक , लस्सी, बासुंदी, पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांना प्रचंड मागणी असते. याचा काळात आइस्क्रीम व्यवसायकांची दुधाला भरपूर मागणी असते. त्यामुळे एप्रिल ते मे पर्यंत दुधाचा दर ७० लिटरपर्यंत जात असतो, पण सध्या बाजारच बंद असल्याने आणि लोक गावी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.

चारा लॉकडाऊनपूर्वीचा दर सध्याचा दरकडबाकुट्टी ९ ते १० रुपये किलो १५ ते १६ रुपये किलोभाताचा पेंडी ३ ते ४ रुपये किलो ७ ते ८ रुपये किलो

घसरता दुधाचा दर

  • १५ मार्च - ६० ते ६५ रुपये लिटर
  • २० मार्च - ५० ते ५५ रुपये लिटर
  • २५ मार्च - ५० ते ४५ रुपये लिटर
  • ३० मार्च - ४३ ते ४० रुपये लिटर

खुराक लॉकडाऊनपूर्वीचा सध्याचा दरदर दर

  • सरकी पेंड नं. १ २१ रु .किलो २८ रु .किलो
  • सरकी पेंड नं. १ १९ रु .किलो २५ ते २६ रु .किलो
  • मका १९ रु .किलो २५ रु .किलो
  • काळणा २४ रु .किलो २९ रु .किलो
  • साधी तांब २१ रु .किलो २५ रु .किलो

 

पशुखाद्याच्या दरात कृत्रिम झालेली वाढ आणि लॉकडाऊनमुळे दुधाचे घसरलेले दर याचा फटका तबेला मालकास बसत आहे.सध्या टोल बंद असून डिझेलचे भावही कमी असून शेतीमालाचाही तुटवडा नाही. त्यामुळे पशुखाद्यांच्या वाढलेल्या कृत्रिम दरावर सरकारने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.- शामनाथ कदम, तबेला मालक , भिवंडी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईMilk Supplyदूध पुरवठा