करवीर तालुक्यातील पश्चिम भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून हळदी, ता. करवीर येथील बाजारपेठेत कोरोनाबाधित गावातील लोकांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने याचा धोका गावाला निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्रामपंचायत व दक्षता कमिटी यांनी १३ मे ते ३१ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला असून बाजारपेठेसह गावात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या सुरक्षिततेसाठी सिक्युरिटी गार्ड तैनात केले आहेत. तसेच गावात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर तसेच विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली असून, कोल्हापूर-राधानगरी रोडवरही जे वाहनचालक विनामास्क प्रवास करत आहेत, त्यांना गांधीगिरी पध्दतीने मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील सर्व दुकाने व गावातील इतर दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत.
कोरोना साखळी तोडण्यासाठी हळदीत लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:22 AM