शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

Lok Sabha Election 2019 : भगव्या टोप्या, पंचरंगी झेंडे, मंडलिकांचा अर्ज भरताना मान्यवरांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 4:37 PM

हलगीचा कडकडाट, उपस्थितांच्या डोक्यावरील भगव्या टोप्या, शिवसेनेच्या भगव्यासह लहरणारे भाजप, आरपीआय, रासपचे पंचरंगी झेंडे आणि मान्यवरांची उपस्थिती अशा जल्लोषी वातावरणामध्ये शिवसेना भाजपचे कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा अर्ज सोमवारी दुपारी दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देभगव्या टोप्या, पंचरंगी झेंडेमंडलिकांचा अर्ज भरताना मान्यवरांची उपस्थिती

कोल्हापूर : हलगीचा कडकडाट, उपस्थितांच्या डोक्यावरील भगव्या टोप्या, शिवसेनेच्या भगव्यासह लहरणारे भाजप, आरपीआय, रासपचे पंचरंगी झेंडे आणि मान्यवरांची उपस्थिती अशा जल्लोषी वातावरणामध्ये शिवसेना भाजपचे कोल्हापूरचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा अर्ज सोमवारी दुपारी दाखल करण्यात आला.अर्ज दाखल करण्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी तालुक्यातून आणि शहरातून निवडक कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे सकाळी १0 पासूनच जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉलवर गर्दी दिसत होती. हॉलमध्ये एकीकडे भगव्या टोप्या आणि शिवसेनेच्या मफलरचे वितरण सुरू होते.अशातच एक एक नेते येण्यास सुरूवात झाली. साडे दहाच्या सुमारास संजय मंडलिक या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यासमवेत फोटो काढण्यासाठी गर्दी उडाली. सव्वा अकरानंतर जयलक्ष्मीमधून सर्वजण बाहेर पडले. ‘जय भवानी,जय शिवाजी’च्या घोषणा देत नेते कार्यकर्ते वातावरण तयार करत होते.जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, आमदार सुरेश हाळवणकर,चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, आजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी, माजी आमदार संजयबाबा घाटगे, सुरेश साळोखे, राजेश पाटील, अंबरिश घाटगे, विजयसिंह मोरे, बाबुराव देसाई, चंद्रकांत जाधव, विजय सुर्यवंशी, राजेखान जमादार, आरपीआय आठवले गटाचे प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे,वैशाली मंडलिक, शिवानी भोसले, दीपाली घाटगे, शुभांगी पोवार, यांच्यासह सर्व कार्यकर्ते बाहेर पडताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील रॅलीत सहभागी होण्यासाठी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.यानंतर १00 मीटरच्या अंतरावर आल्यानंतर पालकमंत्री पाटील, सर्व आमदार आणि निवडकांना आत सोडण्यात आले. त्यानंतर मंडलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावून अर्ज भरला. पाऊण तासानंतर अर्ज दाखल करून आल्यानंतर महावीर उद्यानामध्ये थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मंडलिक यांनी आभार मानले.

चंद्रकांत पाटील यांनी दिल्या घोषणारॅलीतून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येताना मध्येच सर्व नेत्यांनी एकत्रित फोटोसाठी पोझ दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘शिवसेना भाजप आरपीआय रासप, शिवसंग्राम युतीचा’ अशी घोषणा दिल्या.पालकमंत्री तातडीने रवानाकेवळ अर्ज दाखल करण्याच्या रॅलीसाठी आलेले मंत्री पाटील हे दोन मिनीट चालले आणि त्यांनी अर्ज दाखल करण्यासाठी इतरांना पुढे पाठवून ते कराडकडे रवाना झाले. तेथून ते हेलिकॉप्टरने इंदापूरला जाणार होते.

चंद्रकांत पाटील यांचा चरणस्पर्शरॅलीमध्ये चंद्रकांत पाटील आल्याआल्या प्रा. संजय मंडलिक यांनी त्याच गर्दीत वाकून पाटील यांना नमस्कार केला. पाटील यांना युतीचे मफलर घालण्यात आले आणि रॅली पुढे निघाली.

राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षांचे पतीही उपस्थितया निवडणुकीत पै पाहुण्यांचे राजकारणही जोरात असल्याचे दिसून आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संचालिका संगीता खाडे या राष्ट्रवादीच्या महिला ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा आहेत. मात्र त्यांचे आणि मंडलिक यांचे नाते आहे.त्यामुळे त्यांचे पती मंडलिक यांचा अर्ज दाखल करताना उपस्थित होते.

कॉंग्रेस, जनता दल, राष्ट्रवादी कार्यकर्तेही उपस्थितया रॅलीवेळी कॉंग्रेसच्या सतेज पाटील यांचे कार्यकर्ते तर होतेच. त्याचबरोबर गडहिंग्लज जनता दलाचेही निवडक कार्यकर्ते आले होते.श्रीपतराव श्ािंदे यांनी अजून भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे आमचे नाव घालू नका असेही त्यातील एकजण सांगून गेला. राष्ट्रवादीचेही काही कार्यकर्ते दिसून येत होते.हळदकर यांचा अनोखा प्रचारकागल तालुक्यातील चिमगावचे साताप्पा हळदकर हे मंडलिक यांचे कट्टर समर्थक. त्यांनी आपल्या हॅटवर लाकडी धनुष्यबाण चिन्ह तयार करून लावले होते. त्यामुळे ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

महाडिक येणार असल्याने पोलिसांची धावपळदुपारी १ नंतर धनंजय महाडिक हे अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याने त्याआधी हे सर्व कार्यकर्ते येथून हलावेत यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचीही धावपळ सुरू होती.

कॅमेरा आणल्यानंतर कार्यकर्ते हललेजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महावीर उद्यानाच्या कडेला कार्यकर्ते होते. ते पोलिसांनी सांगूनही तेथून हलेनात. अखेर निवडणूक विभागाच्या प्रतिनिधींनी कॅमेराव्दारे चित्रीकरण सुरू केल्यानंतर कार्यकर्ते पाठीमागे जावून बसले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूरShiv Senaशिवसेना