शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

Lok Sabha Election 2019 उमेदवारी, प्रचारातही साखरसम्राटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:11 AM

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : साखरपट्टा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर मतदारसंघातील दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार साखर कारखानदारच ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखरपट्टा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर मतदारसंघातील दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार साखर कारखानदारच आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व प्रचारयंत्रणांसह राबणारेही साखरसम्राटच आहेत. आजच्या घडीला मतदारसंघातील नऊ कारखान्यांनी भूमिका स्पष्ट केली असून, त्यांपैकी चौघांची कुमक युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना, तर उर्वरित पाच कारखानदारांची कुमक महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे दिसत आहे. अजून काही कारखानदारांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. कारखानदारांमध्येच सामना होत असला, तरी साखर उद्योगाविषयीचे प्रश्न मात्र या दोघांनीही दुर्लक्ष केले असून, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या उडालेल्या राळेत ऊस उत्पादकांचे दुखणेच विस्मृतीत गेले आहे.साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे झाल्याच्या टीका कितीही झाल्या, तरी अजूनही कारखाना केंद्रबिंदू मानून राजकीय समीकरणांची मांडणी होतानादिसते.कारखान्यातील यंत्रणा थेटपणे सक्रिय प्रचारात उतरविली जाते. कामगारांबरोबरच स्वत: कारखानदार, संचालक उमेदवारांच्या व्यासपीठावर सर्रासपणे वावरताना दिसतात. कोल्हापुरात सहकारी साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने, तर सभासद हे कार्यकर्ते म्हणूनच काम करताना आढळतात.कोल्हापुरात समोरासमोर उभे ठाकलेले प्रा. संजय मंडलिक व खासदार धनंजय महाडिक हे दोघेही साखर कारखानदार आहेत. प्रा. मंडलिक हे हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, तर खासदार महाडिक हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.कोल्हापूर लोकसभेअंतर्गत कागल, राधानगरी-भुदरगड, चंदगड, करवीर, दक्षिण, उत्तर अशा सहा मतदारसंघांत १३ कारखाने येतात. त्यांपैकी आतापर्यंत १0 कारखान्यांनी भूमिका जाहीर केली आहे, तर उर्वरित तीन कारखान्यांची भूमिका ठरलेली नाही. गडहिंग्लज कारखान्याचे चेअरमन श्रीपतराव शिंदे यांनी अजून भूमिका जाहीर केलेली नाही. हेमरस, इकोकेन, फराळे हे खासगी कारखाने आहेत.हातकणंगलेतही कारखानदारांचेच वर्चस्वऊसदर आंदोलनाच्या माध्यमातून साखर कारखानदारांशी दरवर्षी दोन हात करणारे खासदार राजू शेट्टी हातकणंगलेतून तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. आतापर्यंत एकाकी झुंज देणाऱ्या शेट्टींना यावेळी मात्र सुरुवातीपासून कारखानदारांचे बळ मिळत आहे. यात आवाडे यांचा जवाहर-हुपरी, यड्रावकर यांचा शरद-नरंदे आणि गणपतराव पाटील यांचा दत्त-शिरोळ, बांबवडेच्या मानसिंग गायकवड यांच्या कारखान्याचा समावेश आहे. तसेच इस्लामपुरातून जयंत पाटील यांचे बळ पहिल्यांदाच मिळाले आहे. ‘वारणे’चे विनय कोरे यांची भूमिका अजून ठरलेली नाही. याउलट विरोधी उमेदवार धैर्यशील माने यांना वाळव्याच्या हुतात्मा कारखान्याचे बळ मिळाले आहे. ‘गुरुदत्त’च्या माधवराव घाटगे यांनी अजून भूमिका उघड केलेली नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक