जहाँगीर शेख ।कागल : सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यात अजून म्हणावा तितका ‘इलेक्शन ज्वर’ कार्यकर्त्यांमध्ये नाही.तालुक्यातील प्रमुख चार गटांपैकी मंडलिक गटाचे प्रमुखच शिवसेनेचे उमेदवार असल्याने हा गट यजमानाची, तर अन्य गट पाहुण्यांची भूमिका सध्या बजावत आहेत.
आमदार हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी तालुक्याचा दौरा पूर्ण करीत आणला आहे, तर शिवसेनेचे संजय घाटगे, भाजपचे समरजित घाटगे यांनीही प्रा. मंडलिकांच्या प्रचारासाठी गाववार बैठका, सभा घेणे सुरू केले आहे.‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, माजी उपसभापती भूषण पाटील यांनी खासदार महाडिकांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर प्रवीणसिंह पाटील मुश्रीफांसोबत असल्याचे जाहीर करून सावधगिरी बाळगत आहेत. विशेष म्हणजे आपल्या भाषणातून आमदार मुश्रीफ पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या जुमलेबाजीवर बोलत आहेत, तर समरजित घाटगे आपण विधानसभेसाठी तयार आहोत. मंडलिकांबरोबर मलाही साथ द्या, असे आवाहन करीत आहेत.
संजय घाटगे हे प्रा. मंडलिकांवर स्तुतिसुमने उधळीत असताना अमरीश घाटगे हे धनंजय महाडिक यांच्या संसदरत्न पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेतखरेतर लोकसभेसाठी खासदार महाडिक यांना पहिल्यांदा प्रमोट करण्याचे काम विक्रमसिंह घाटगे यांनी केले होते, तर २००४ रोजी प्रा. संजय मंडलिक यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला होता. गत लोकसभा निवडणुकीत मंडलिकांच्या पाठीशी संजय घाटगे, बाबासाहेब पाटील होते, तर महाडिक यांच्यासोबत मुश्रीफ, राजे, पाटील होते. तालुक्यातील उमेदवार असूनही प्रा. मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नव्हते. कागल, सांगाव, सिद्धनेर्ली परिसरात तर महाडिक यांना मताधिक्य मिळाले होते. पुढे हे मताधिक्य कमी होत गेले आणि मंडलिकांना दहा हजारांवर मताधिक्य लाभले. नंतर हाच पॅटर्न विधानसभेलाही चालला.
नगरपालिका निवडणुकीत तर राजकीय गुंता झाला. जिल्हा परिषदेची निवडणूक तिरंगी झाली. मंडलिक-संजय घाटगे एकत्र असूनही तिरंगी लढतीचा त्यांना फायदा झाला नाही. उलट मुश्रीफ गटाला ‘अच्छे दिन’ आले. निकालानंतर जिल्हा परिषदेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने अमरीश घाटगे यांना सभापतिपद मिळाले, तर पं. समितीत मुश्रीफ-मंडलिक यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. तालुक्यातील सहकारातही एकमेकांच्या संस्था बिनविरोध करण्याचे धोरण या नेतेमंडळींनी राबविले. जिल्हा बँकेत मुश्रीफ-मंडलिक, तर ‘बिद्री साखर’मध्ये तालुक्यात मुश्रीफ, राजे, पाटील एकत्र आले. गोकुळ मल्टीस्टेटवेळी रणजितसिंह पाटील, संजय घाटगे हे ठरावाच्या बाजूने, तर मुश्रीफ, मंडलिक, प्रवीणसिंह पाटील विरोधात सक्रिय होते. अशा प्रत्येक निवडणुकीत सोयीस्कर भूमिका घेण्याचे काम सर्वच राजकीय मंडळींनी केले आहे. त्यातून गावागावांतील कार्यकर्तेही आपल्या गावचे राजकारण या लोकसभेच्या निवडणुकीत बाहेर काढीत आहेत. एकंदरीत ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.कागल तालुक्यातील राजकीय बलाबलजि.प. सदस्य- ५ - पं. समिती- १०मुश्रीफ गट = ३ ५मंडलिक गट = १ ४संजय घाटगे = १ १
कागल नगरपालिकामुश्रीफ गट - नगराध्यक्ष, ८ सदस्यमंडलिक गट - २, राष्ट्रवादीपुरस्कृत अपक्ष - १राजे गट - ९ सदस्य
मुरगूड नगरपालिकामंडलिक गट- नगराध्यक्ष, १४ सदस्यमुश्रीफ गट - २, प्रवीणसिंह पाटील-१साखर कारखाने.छत्रपती शाहू - राजे गटहमीदवाडा - मंडलिक गटसरसेनापती - मुश्रीफ गटअन्नपूर्णा (नियोजित) - संजय घाटगे गटबिद्री - मुश्रीफ गट - ४, राजे गट - ३ संचालक.२०१४ लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते. (केवळ कागल तालुका.)प्रा.संजय मंडलिक : ९१३४२धनंजय महाडिक : ८०७४०मताधिक्य : १०६०२