विश्वास पाटीलकोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ॅविद्यमान खासदारांनी किती विकासकामे केली, यापेक्षा त्यांनी किती पक्षविरोधी भूमिका घेतल्या, याचभोवती निवडणूक फिरत आहे. शिवसेनेच्या प्रा. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे.भाजप-शिवसेनेने येथे राज्याच्या प्रचाराचा नारळ फोडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांनी हवा निर्माण करण्यात यश मिळविले. त्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दोनदौरे करून काही जोडण्या लावल्या आहेत.उमेदवार म्हणून प्रतिमा आणि विकासकामे करण्यातही महाडिक यांचा पुढाकार राहिला. संसदेत उत्तम छाप पाडल्यानेच पक्षांतर्गत विरोध असतानाही शरद पवार यांनी त्यांनाच उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या विरोधात उघड बंड पुकारले व महाडिक यांच्या पक्षविरोधी भूमिकांचा पाढा वाचला. त्यातून वातावरण बदलत गेले. महाडिक कुटुंबात सत्तेची पदे एकवटल्याची नाराजीही आहे. जिल्ह्याचेराजकारण मुठीत ठेवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा लोकांना आवडलेली नाही. महाडिक यांना मात्र लोक चांगल्या कामाची पोहोचपावती म्हणून पुन्हा संधी देतील, असा विश्वास वाटतो.मंडलिक यांच्यासाठी शिवसेना-भाजप एकजुटीने कामास लागली आहे. काही झाले, तरी यावेळेला खासदार करायचाच, या जिद्दीने शिवसेना मैदानात उतरली आहे. तर मंडलिक दुपारी बाराला उठतात, सायंकाळी सातनंतर नॉट रिचेबल असतात. वडिलानंतर हे पदमिळायला खासदारकी म्हणजे काय अनुकंपाची नोकरी आहे का? असे मुद्दे उपस्थित करून मंडलिक यांच्या दुखऱ्या बाजू महाडिक गट नेटाने मांडत आहे.वंचित बहुजन आघाडीने डॉ. अरुणा माळी यांना उमेदवारी दिली आहे. अटीतटीच्या लढतीत त्यांची मते ही राष्ट्रवादीचीच डोकेदुखी वाढविणारी ठरण्याची चिन्हे आहेत.कळीचे मुद्देपक्षापेक्षा उमेदवाराचे कर्तृत्व आणि खासदार म्हणून पाडलेली छाप यावर राष्ट्रवादीचा भर आहे.विकासाच्या प्रश्नांपेक्षा उमेदवाराचा दलबदलूपणा आणि भावनिक मुद्द्यांवर निवडणूक केंद्रित होताना दिसत आहे.गेल्या २५ वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात खासदार म्हणून जेवढी कामे झाली नाहीत, तेवढी कामे मागच्या पाच वर्षांत करून दाखविली आहेत. संसदेच्या कामांत उत्तम छाप पाडली आहे. याची मतदार नक्कीच दखल घेतील.- धनंजय महाडिक,राष्ट्रवादी काँग्रेस‘संसदरत्न’ पुरस्काराचा टेंभा मिरविणाºया विद्यमान खासदारांनी जिल्ह्यातील विकासाकडे लक्ष दिले नाही. प्रत्येक वेळी सोईनुसार राजकीय भूमिका घेणाऱ्यांना मतदार या निवडणुकीत चांगला धडा शिकवतील.- प्रा. संजय मंडलिक,शिवसेना
Lok Sabha Election 2019 मंडलिक यांचे राष्ट्रवादीपुढे कडवे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:13 AM