लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या ४ जून रोजी समोर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले. या पोलमध्ये एनडीए पुन्हा देशात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, महायुतीकडून धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून सत्यजीत पाटील यांनी निवडणूक लढवली. दरम्यान, आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी निकालाआधी मोठा दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विजयाबाबत मोठा दावा केला आहे.
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
"सर्व सामान्य जनतेवर माझा विश्वास आहे, २०१९ मध्ये माझा पराभव झाला. त्यानंतर मी या मतदारसंघातील लोकांना भेटत राहिलो, आंदोलने करत राहिलो. पराभव मनात न ठेवता मी काम करत राहिलो. वेगवेगळ्या प्रश्नावर भीडत राहिलो. माझा जनतेशी संपर्क असल्यामुळे मला कोणत्या नेत्याची गरज नाही. सत्याचा आग्रह धरुन मी नेहमी आम्ही आंदोलने करत असतो. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी माझ्यामागे होती, असंही राजू शेट्टी म्हणाले.
"महाविकास आघाडीकडे जे नेते होते ते सगळे कारखानदार होते. महायुतीचे जे नेते होते ते सत्ताधारी नेते होते. या दोन्ही नेत्यांच्या विरोधात मी या निवडणुकीत उतरलो होतो. मी सामान्य माणसावर विश्वास ठेवून मी निवडणुकीत उभा होतो. शंभर टक्के मी पन्नास हजार ते एक लाख मताधिक्क्याने निवडून येऊ शकतो, असा विश्वासही राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
एक्झिट पोलचा अंदाज काय
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांना तर महायुतीने शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली होती. तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे पण निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. दरम्यान, आता टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार, ठाकरे गटाचे सत्यजित पाटी आघाडीवर असल्याचे दाखवले आहे.