शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

'गादी विरुद्ध मोदी'! प्रचाराचा धुरळा, कोल्हापुरात कुणाची हवा?, शाहू महाराज की संजय मंडलिक?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 10:10 AM

Lok Sabha Elections 2024 : कोल्हापूर मतदारसंघात कोणाचे वर्चस्व असणार, हे निकालानंतर येणाऱ्या मताधिक्यावर अवलंबून असणार आहे.

Kolhapur Parliamentary Constituency : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख बड्या नेत्यांनी प्रचारासाठी यंत्रणा सतर्क केली असून मोठ्या सभांचा फड कुठे ना कुठे रोज भरताना दिसून येत आहे. तर काही ठिकाणी प्रचारासाठी आणि उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील, यासंदर्भात रणनीती ठरवली जात आहे.

महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या गादीचे वारस छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात असलेले महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक हे सलग तिसऱ्यांदा रिंगणात उतरलेले आहेत. खरंतर ही लढत 'गादी विरुद्ध मोदी' अशी होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात दोन्ही उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन आणि तालुकानिहाय प्रचारावर जोर दिला जात आहे.

संजय मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपाचे खासदार धनंजय महाडिक, समरजितसिंह घाटगे, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर अशा प्रमुख नेत्यांनी उचललेली आहे. या प्रत्येक नेत्याने आपापल्या विधानसभा मतदारसंघात तालुकानिहाय मोठे मेळावे, सभा आयोजित केले आहे. या माध्यमातून संजय मंडलिक यांचे शक्ती प्रदर्शन केले जात आहे. कोल्हापूर शहरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचारावर जोर दिला आहे.

चंदगड येथील यशंवतनगरमध्ये झालेल्या सभेत उदय सामंत यांनी यांनी संजय मंडलिक यांना तालुक्यात लाखाचे मताधिक्य देण्याचा निश्चय केल्याचे सांगितले. तर कागल येथील एका सभेत तर हसन मुश्रीफ यांनी तालुक्यात लाखाचे मताधिक्य मिळवणार असे सांगून एकप्रकारे विरोधकांना धडकी भरवली आहे. याशिवाय, संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवावी, निवडणुकीत कशा पद्धतीने प्रचार करावा तसेच रणनीती काय असावी? यावर चर्चा करण्यासाठी राजेश क्षीरसागर यांनी 'मिसळ पे चर्चा' चे आयोजन केले होते. यावेळी जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. 

दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील आणि संजय घाडगे यांनी मैदानात शड्डू ठोकला आहे. शाहू महाराज यांच्या प्रचाराची मुख्य धुरा सतेज पाटील यांच्या खांद्यावर आहे. दोन दिवसांपूर्वी शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, गेल्या काही दिवसांपासून शाहू महाराजांच्या प्रचारासाठी सतेज पाटील ठिकठिकाणी सभा घेताना दिसून येत आहेत. याशिवाय, कोल्हापूर उत्तर व दक्षिण या मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव तर करवीर विधानसभा मतदारसंघात पी. एन. पाटील यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.   कोल्हापूर मतदारसंघाच्या उत्तरेकडील भागात काँग्रेसचे वर्चस्व आहे तर दक्षिणेकडे महायुतीचे वजन आहे. त्यामुळे दक्षिणेकडे भागात महाविकास आघाडीकडून प्रचारावर भर देण्यात येत आहे. चंदगडमध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील यांचे संजय मंडलिक हे मेहुणे आहेत. तर कागल, आजरा, गडहिंग्लज भागात हसन मुश्रीफ हे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी रणनीती आखत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून या भागात जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्यासह गोपाळराव पाटील, नंदिनी बाभुळकर, स्वाती कोरी यांच्याकडे प्रचाराची मोठी जबाबदारी असल्याचे दिसून येत आहे.

याचबरोबर, कोल्हापूरात वंचितनेही शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे. तसेच, शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपती आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी गावं पिंजून काढत आहेत. संभाजीराजे यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग असला तरी या मतदार संघातील महायुतीच्या बड्या नेत्यांचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचे प्रचार मोठ्या ताकतीने सुरू असून घरातील सर्व मंडळी झोकून देऊन काम करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात कोणाचे वर्चस्व असणार, हे निकालानंतर येणाऱ्या मताधिक्यावर अवलंबून असणार आहे.

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीSanjay Mandalikसंजय मंडलिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४kolhapurकोल्हापूर