कोल्हापूर : ज्यांच्यावर निष्ठा ठेवून लढाईला जाणार होतो, तो देवच डॉ. डी. वाय. पाटील चोरीला गेला, पण देवाचे आशीर्वाद आमच्यासोबतच असणार, असा विश्वास शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. तर देव जरी चोरीला गेला तरी लोकसभेला मी तुमच्यासोबतच आहे, असा पुनरूच्चार आमदार सतेज पाटील यांनी केला.तपोवन मैदानावर सुरू असलेल्या ‘सतेज कृषी’ प्रदर्शनाच्या सोमवारी झालेल्या सांगता समारंभात चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली. प्रा. मंडलिक म्हणाले, लोकसभा निवडणुकीत कोण कोणाबरोबर राहील; हेच कळत नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील त्यास मी बांधील आहे. मागील लोकसभेला सतेज पाटील मंत्री होते. त्यामुळे तुम्हाला ‘आघाडी धर्म’ पाळावा लागला. आता एका बाजूला भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य उभे आहेत, तुम्ही श्रीकृष्णाची भूमिका बजावावी.सतेज पाटील हे आमच्यापेक्षा लहान असले तरी अनुभव मोठा असल्याने जमिनीला घात कधी येते, नांगरायचे कधी आणि बियाणे कोणते वापरायचे; हे त्यांना चांगले कळते, असा टोला आमदार चंद्रदीप नरके यांनी हाणला. तुम्हाला सहकार्य करतो आणि पुढे सगळे माझ्याविरोधात जातात. माझ्यासोबत येता आले नाही तर किमान आशीर्वाद तरी द्या.आमचा कडीपत्ता करू नका : नरके1आमचा कडिपत्त्यासारखा वापर करू नका, असा टोला आमदार नरके यांनी लगावला. ते म्हणाले, रणांगण जवळ आले असून, सतेज यांनी हातात ‘घड्याळ’ बांधले आहे. सन २००४ ला तुम्हीही सात झेंडे घेतले होते. आम्हाला हातात धनुष्यबाण घ्यावा लागणार आहे. आमच्याकडे थोडे लक्ष असू द्या, हसन मुश्रीफ यांनी याच व्यासपीठावर हातात हात घालून एकत्र राहण्याची भाषा केली, पण त्यांचा हा प्रामाणिकपणा कागलमध्ये दिसत नाही, असा टोला नरके यांनी लगावला.संपतराव पवार यांनीही साखर कारखानदार व सरकारच्या विरोधात जोरदार फटकेबाजी केली. पालकमंत्र्यांनी सल्लेदेणे बंद करावेएफआरपी देण्यासाठी कमी पडणारे ३००-४०० रुपये देण्याचे नाव न काढणारे पालकमंत्री शेतकऱ्यांना अल्पव्याजाने कोट्यवधीचे कर्ज देण्यास निघाले आहेत. इतरांच्या कायद्याचे तंतोतंत पालन करायचे; पण शेतकºयांना चौदा दिवसांत पैसे देणारा कायदा या मंडळींनी मसणात घालविला आहे, अशा मंडळींनी सल्ले देण्याचे बंद करावे, अशी टीका संपतराव पवार यांनी केली.
लोकसभेला मी संजय मंडलिकांसोबतच: सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 12:59 AM