कोल्हापूर : नववर्षात तंदुरुस्त राहा, असा संकल्प करत, आपल्या कर्मचारी व नातेवाईक अशा १00 जणांना घेऊन प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शीतल संघवी हे ६ जानेवारीला होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहेत. धावणे हे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी चांगले असून, जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे व आपले आरोग्य उत्तमरीत्या जपावे, असे आवाहन त्यांनी कोल्हापूरकरांना केले आहे.पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडानगरी म्हणून गणल्या गेलेल्या करवीरमध्ये ६ जानेवारी २०१९ रोजी व्हिंटोजिनो प्रस्तूत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्डबाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’चा थरार रंगणार आहे. या महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यानंतर धावपटू यात सहभागी होण्यासाठी आतुर झाले होते. त्याप्रमाणे राज्यातील धावपटंूसह सर्वसामान्य नागरिकांचाही नावनोंदणीकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
यामध्ये कोल्हापुरातील प्रियदर्शिनी पॉलिसॅक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शीतल संघवी यांनी आपल्या कर्मचारी व नातेवाईक, मित्रमंडळीसमवेत नववर्षात मॅरेथॉनमध्ये धावण्याचा संकल्प केला आहे. धावणे हे आरोग्यासाठी चांगले असून, आपल्या कर्मचारी, नातेवाईक व मित्रमंडळींनी यामध्ये सहभागी व्हावे, या उद्देशाने संघवी यांनी हे पाऊल उचलले आहेत. त्यांनी ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये १० कि. मी. गटात १00 जणांची नोंदणी केली आहे.
महामॅरेथॉनसाठी गुरुवारपर्यंत नोंदणी‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वासाठी धुमधडाक्यात नोंदणी सुरू झाली आहे. कोल्हापुरात गेल्यावर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्ध तंदुरुस्त राहावेत, या हेतूने यावर्षी आयोजित केलेली ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन ३ किलोमीटर अंतराची असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे.त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे. विदेशातील स्पर्धकांनादेखील या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि. २० डिसेंबरपर्यंत आहे.
नावनोंदणीसाठी संपर्कया महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. मोबाईल नंबर (रोहन भोसले) ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर नोंदणी करता येणार आहे.