कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, उत्तर कर्नाटकातील धावपटूंसह सर्वसामान्यांची उत्कंठा लागून राहिलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ सीझन-२ अर्थात दुसऱ्या पर्वातील २१ कि.मी. खुल्या गटात पुरुषांमध्ये गुरुजितसिंग याने प्रथम; तर महिलांमध्ये सायली कुपटे हिने प्रथम क्रमांक पटकावीत बाजी मारली. गुरुजितसिंगने नाशिक महामॅरेथॉनमध्ये डिफेन्स २१ कि.मी. रनही जिंकली होती.
सायली कुपटेपोलीस परेड मैदान येथे रविवारी सकाळी झालेल्या या महापर्वात चार हजारांहून अधिक धावपटू, नवोदित, सरकारी कर्मचारी, अधिकारी, आमदार, सुपर क्लासवन अधिकारी आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. प्रत्येक सहभागी धावपटूंनी क्रमांक येवो न येवो; मात्र, सहभाग घेतलेले किलोमीटर धावून पूर्ण करण्याचा निश्चय केला होता. त्याप्रमाणे अनेकांनी ही रन पूर्ण केली.
गटनिहाय सविस्तर निकाल असा २१ कि.मी. खुला गट-१) (बीब क्रमांक -के २११८०)-गुरुजितसिंग, नाशिक (१ तास ११ मि.०३ सेकंद), २) (बीब क्र. के २११७७)-अक्षय बाळू अलांडे, (१ तास ११ मि.४८ सेकंद), ३) (बीब. क्र. के २१३३४)- तानाजी चौगले (१ तास १२ मि.२९ सेकंद).
महिलांमध्ये १) (बीब क्र. के २१११४)-सायली बलराम कुपटे, गडहिंग्लज (महागाव) (१ तास ३० मि. ३५ सेकंद), २) (बीब क्र. के २१३२२)- राजश्री परिहार (१ तास ३७ मि. ३३ सेकंद), ३) (बीब क्र. २१०६६) प्रतीक्षा (१ तास ४० मि. १४ सेकंद).
२१ कि.मी. (डिफेन्स) पुरुष - १)(बीब. क्र. डी २१०१५)-राजेश कुमार यादव, २) (बीब. क्र.२१०१४)-मराबोई संपत, ३)(बीब. क्र. २१०१८)-अमरसिंग पवरा महिलांमध्ये १) (बीब. क्र. डी. २१०१६)-जयश्री बोरगी, २) (बीब. क्र. डी. २१०२२)-मिताई देसाई, ३) (बीब. क्र. डी. २१००६)-अश्विनी देवरे.
२१ कि. मी. ज्येष्ठ-पुरुष-१) (बीब. क्र.के.२११४०)-सुरेश कुमार, २) (बीब. क्र. के २१२९३)-पांडुरंग पाटील, ३) (बीब. क्र. के २१२८४)- कैलास माने,महिलांमध्ये १) (बीब. क्र. के २१२९१)- शोभा देसाई, २)(बीब. क्र.- के २११००)-पल्लवी मूग, ३)(बीब. क्र. के २१०७७)-विद्या दापोडकर.
१० कि.मी. खुला गट (पुरुष)-१) (बीब. क्र. के १०२९६)- महादेव कुंभार, २) (बीब. क्र. के १०२९८)-गौरव पवार, ३)(बीब. क्र. के १०२२९)-सौरभ आमटे
महिलांमध्ये १)(बीब. क्र. के १०३३०)-स्वाती वानवडे, २) (बीब. क्र. के १०२६१)-सायली कोकीतकर, ३) (बीब. क्र. के १०००४)-पूजा शिरडोले.१०. कि.मी. पुरुष (ज्येष्ठ)-१) (बीब. क्र. के १०२१२)-सुरेंद्र कुमार, २)(बीब. क्र. के १०१५५)-विश्वास चौगुले, ३) (बीब. क्र. के १०१८६)-रमेश चिवलकर, तर महिलांमध्ये १) अनिता पाटील, २) माधुरी निमजे, ३) दीपा तेंडुलकर, यांचा समावेश आहे.या विजेत्यांना महापौर सरिता मोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मधुरिमाराजे, उपमहापौर भूपाल शेटे, क्वेस्ट टूर्सचे प्रसाद पाटकर, वारणा दूध संघाचे के. एम. वाले, शिवाजी जंगम, समित कदम, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी. एम. हिर्डेकर, संजय घोडावत विद्यापीठाचे विपणन व्यवस्थापक अभिजित लाटकर, क्रीस्टा इलेव्हटर्सच्या जॉर्इंट मॅनेजिंग डायरेक्टर स्नेहा रेवाळे, विद्याप्रबोधिनीचे चेअरमन राहुल चिकोडे, संदीप युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर (अॅडमिशन) डी. डी. शिंदे, माणिकचंद आॅक्सिरिचचे फँ्रचाईजी व कशीश फुड अॅन्ड अॅग्रोचे रमेश लालवाणी, विन्टोजीनोचे चेअरमन प्रकाश उपाध्याय, आसमाचे अध्यक्ष राजू परुळेकर, अमरदीप पाटील, स्टुडंट वेल्फेअरचे अरिफ मन्सुरी, लोकमतचे व्हाईस प्रेसिडेंट बी. बी. चांडक, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.