कोल्हापूर : ‘लोकमत’च्या वतीने, जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव समारंभ शुक्रवारी (दि. १५) सकाळी १० वाजता राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे होत आहे. ‘लोकमत सरपंच आॅफ द इअर’ अवॉर्डसह विविध गटांतील १३ ग्रामपंचायतींना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व राष्टÑवादी कॉँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ, महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.‘लोकमत’च्या वतीने गेल्या वर्षीपासून राज्यभर जिल्हानिहाय १३ गटांत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना गौरविले जात आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष असून, कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल २०० हून अधिक ग्रामपंचायतींनी विविध गटांत प्रस्ताव दाखल केले होते. या प्रस्तावांची निवड समितीने पडताळणी करून त्यातून १३ ग्रामपंचायतींची निवड केली. ‘सरपंच आॅफ द इअर’, ‘उदयोन्मुख सरपंच’ यासह जल व्यवस्थापन, घनकचरा-सांडपाणी व्यवस्थापन, आदी गटांतील १३ ग्रामपंचायतींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.शुक्रवारी सकाळी दहा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, आमदार हसन मुश्रीफ व महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा दणक्यात होणार आहे.ग्रामस्वच्छता अभियानात सरकारी यंत्रणेला दिशा देण्याचे काम करणारे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल केलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. २
लोकमत ‘सरपंच अवॉर्ड’चे शुक्रवारी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:53 AM