कोल्हापूर : कोल्हापूरच्या खाद्यपदार्थांच्या चवीला रुबाबदार बनविण्यासाठी ‘लोकमत’तर्फे आयोजित केलेल्या ‘कोल्हापूर नंबर वन फूड अवॉर्डस्’ या आगळ्यावेगळ्या विशेष स्पर्धेसाठी कोल्हापुरातील हॉटेलचालकांकडून प्रतिसाद मिळत आहे. अनेक हॉटेलचालकांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली असून, या स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. २१ जुलै ही अंतिम तारीख असून ज्यांना अजूनही या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, त्यांनी लोकमत कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन ‘लोकमत’ने केले आहे. या स्पर्धेसाठी सहा अवॉर्ड कॅटॅगरीज् आहेत. ही स्पर्धा कोल्हापूर शहरापुरती मर्यादित असून या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही.कोल्हापूरच्या थाळीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकमत’ने घेतलेली ही विशेष स्पर्धा येथील हॉटेल, रेस्टॉरंटस्साठी मानाची ठरणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे लागणार आहे. या संदर्भातील अर्ज ‘लोकमत’ कार्यालयात उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)स्पर्धेसाठी सहा अवॉर्ड कॅटॅगरीज्१. नंबर वन मिसळ रेस्टॉरंट २. नंबर वन चायनीज रेस्टॉरंट ३. नंबर वन फास्ट फूड रेस्टारंट ४. नंबर वन पंजाबी रेस्टॉरंट ५. नंबर वन थाळी रेस्टॉरंट,६. नंबर वन लोकप्रिय रेस्टॉरंट.नोंदणीसाठी संपर्क : दीपक (९८८१८६७६००)
‘लोकमत’ देणार ‘नंबर वन फूड अवॉर्डस्’
By admin | Published: July 17, 2016 12:34 AM