शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

भारत-चीनचे ताणलेल्या सबंधाकडे संधी म्हणून पहा :चेतन नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 4:50 PM

भारत-चीनचे ताणलेले सबंध व कोरोना या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजकांनी याकडे संधी म्हणून पाहून तोच ट्रेंड पकडून काम केले तर यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही. असा विश्वास थायलंडचे उपपंतप्रधानाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरूण नरके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देथायलंडचे वाणिज्य सल्लागार चेतन नरके यांचे स्थानिक उद्योजकांना आवाहन जागतिक पातळीवर सगळ्यांशी संबध बिघडवणे चीनला अडचणीचे

कोल्हापूर : चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय केवळ भावनिक करून चालणार नाही. त्याचा फटका दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो, जागतिक पातळीवर सर्वच देशांशी बिघडलेले सबंध चीनला भविष्यात अडचणीचे ठरू शकतात. भारत-चीनचे ताणलेले सबंध व कोरोना या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजकांनी याकडे संधी म्हणून पाहून तोच ट्रेंड पकडून काम केले तर यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही. असा विश्वास थायलंडचे उपपंतप्रधानाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरूण नरके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.चेतन नरके यांनी मंगळवारी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट देत भारत-चीन मधील ताणलेले सबंध आणि कोरोनामुळे घसरलेला जेडीपी यावर सविस्तर चर्चा केली.

नरके म्हणाले, चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे हा भावनिक मुद्दा असला तरी अर्थकारणाचा विचार केला पाहिजे. आपली औषध, खते, आयर्न, स्टील निर्मिती चीनवर अवलंबून आहे. भारतात ज्या प्रमाणे शेतीला अनुदान दिले जाते, त्याप्रमाणे तिथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर उत्पादनांवर अनुदान दिले जात असल्याने त्यांना कमी दरात विक्री करणे परवडते. आपण चीन ५ टक्के निर्यात करतो मात्र १४ टक्के चीनमधून आयात करत आहे. यावरून आपले मार्केट चीनी उत्पादनांनी किती काबीज केले हे स्पष्ट होते.चीनशी बिघडलेले संबधांचा कमी अधिक प्रमाणात सर्वच देशांना फायदा, तोटा होणार आहे. थायलंडची अर्थव्यवस्था सक्षम होण्यात तेथील पर्यटन व्यवसायाचा खूप हातभार आहे. भारतातून दर वर्षी २० लाख पर्यटक थायलंडला जातात. थायलंड मध्ये काही रेडलाईट भाग आहे, ते म्हणजे थायलंड नव्हे तर त्यापेक्षाही येथील शेती, मासेमारी, पर्यटन ही त्यांची बळस्थाने आहेत. थायलंडकडून ही गोष्ट भारताला पर्यायाने महाराष्ट्राला घेण्यासारखी आहे.

महाराष्ट्रात गडकोट किल्ले आहेत, यासह एकूणच पर्यटन स्थले विकसीत केली तर परदेशी पर्यटकांचा ओढा सुरू होईल, आणि यातून किमान ९ लाख रोजगार उपलब्ध होऊ शकतील. याबाबत आपण राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून ते सकारत्मक आहेत. नागरी सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून अंकुश आणला, हे चांगले आहे. सहकार आणि रिझर्व्ह बँकेंने एकत्रित येऊन काम केले तर सहकार चळवळ बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास चेतन नरके यांनी व्यक्त केला. यावेळी लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मुख्य बातमीदार विश्वास पाटील आदी उपस्थित आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर