कोल्हापूर : बिग बझार मॉलच्या घरफाळा आकारणीत करनिर्धारक संजय भोसले यांनी महानगरपालिकेचे सहा कोटींचे नुकसान केल्याची तक्रार नगरसेवक भूपाल शेटे यांनी बुधवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली.बिग बझार मॉलच्या घरफाळा प्रकरणात कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले यांनी घरफाळ्याची आकारणी करताना भाडेकरार तीन लाख तीन हजार ७५२ इतक्या रकमेचा असताना स्वत:च त्यामध्ये ६० हजार ४५६ रुपयांप्रमाणे मासिक भाडे दाखवून वार्षिक रुपये पाच लाख सात हजार ४३० रुपयांप्रमाणे आकारणी करून फाळा भरून घेतला आहे. याबाबत तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणामध्ये सुनावणी घेतली.प्रत्यक्ष कराराच्या रकमेवर घरफाळा लावण्याची तरतूद आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. चौधरी यांनी बिग बझार यांचा मासिक तीन लाख तीन हजार ७५२ रुपये व त्याचे क्षेत्र ३० हजार ६८२ चौरस फूट या इमारतीवर वार्षिक रुपये २५ लाख ५१ हजार ५१७ रुपये इतकी घरफाळा आकारणी करून त्यांना सन २०११ पासून मागील फरकासह व दंडासह रुपये दोन कोटी २४ लाख इतक्या रकमेची घरफाळ्याची नोटीस दिली आहे.कर निर्धारक संजय भोसले यांनीच ही बनावटगिरी केल्याचे आयुक्त यांच्याच अहवालामध्ये सिद्ध झालेले आहे. म्हणूनच आयुक्तांनी भोसले यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी; तसेच त्यांचा घरफाळा विभागाकडील प्रभारी चार्ज काढून घ्यावा, अशी मागणी शेटे यांनी केली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेचे बिग बझार प्रकरणात सहा कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 3:27 PM
बिग बझार मॉलच्या घरफाळा आकारणीत करनिर्धारक संजय भोसले यांनी महानगरपालिकेचे सहा कोटींचे नुकसान केल्याची तक्रार नगरसेवक भूपाल शेटे यांनी बुधवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली.
ठळक मुद्देबिग बझार प्रकरणात सहा कोटींचे नुकसानसंजय भोसले यांनी आपल्या अधिकारात केला घरफाळा कमी : शेटे