कोल्हापूर : गेले दोन वर्षे धुमसत असलेल्या फुटबॉल शौकिनांतील हुल्लडबाजीला रविवारी सायंकाळी पुन्हा तोंड फुटले, मैदानातील वाद सामना संपल्यानंतर मैदानाबाहेर आला, अन् पराभूत दिलबहार तालीमच्या हुल्लडबाजानी तुफान दगडफेक करत रस्त्याकडेच्या उभ्या वाहनांची अतोनात मोडतोड केली.
हुल्लडबाजांच्या हल्यात शाहू छत्रपती आणि माजी आमदार मालोजीराजे यांच्या चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान झाले. दगडफेकीत चार युवक जखमी झाले. पळापळ, धक्काबुक्की आणि पोलिसांचा लाठीमार असे तणावाचे वातावरण झाले होते. परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी स्पेशल फोर्स मागविण्यात आला.हुल्लडबाजांनी रस्त्यावरील वीजेच्या वायरी तोडल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता, त्याचा फायदा घेत टेंबेरोड ते रावणेश्वर मंदीर या मार्गावर फुटबॉल शौकिनांनी रस्त्याकडेला उभ्या केलेल्या चारचाकी, तीन चाकी, दुचाकी वाहनांना लक्ष केले. अक्षरशा मोठ मोठे दगड घालून अनेक वाहनांचे नुकसान केले. चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.गेले पंधरा दिवस येथील छत्रपती शाहू स्टेडीयमवर श्री बालगोपाल तालीम मंडळाच्यावतीने चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरु होत्या, स्पर्धेतील रविवारी अंतीम पाटाकडील तालीम आणि दिलबहार तालीम यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. पण मैदानात खेळाडूंतील इर्षापेक्षा दोन्ही संघातील समर्थकांत असभ्य भाषेत वक्तव्य करत निर्माण झालेली इर्षा शिगेला पोहचली.अखेर सामना संपल्यानंतर विजयी पाटाकडील संघाचे समर्थक मैदानात थांबून राहीले, इतर पराभूत दिलबहार तालीम समर्थक मोठ्या संख्येने टेंबे रोडकडील बाजूच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडले. ते थेट रस्त्यावर उतरुन त्यांनी रस्त्याकडेला उभारलेल्या वाहनांना लक्ष करतच रावणेश्वर मंदीराच्या दिशेने धावले, या हुल्लडबाजांच्या हातात मोठमोठे दगड, काठ्या होत्या. त्यामुळे परिसरात पळापळ झाली, घटनेची चाहूल लागताच पोलीस मैदानाबाहेर धावत येऊन त्यांनी हुल्लडबाजांवर लाठीमार करुन त्यांना पांगवले. त्यानंतर हुल्लडबाज टेंबे रोडपरिसरात जाऊन गटागटाने उभारले, पण पोलिसांनी त्यांनाही हाकलून लावले. त्यावेळी परिस्थिती तणावाची होती.
रस्त्यावरुन स्टेडीयमवर दगडफेकविजयी समर्थक बक्षीस वितरणसाठी स्टेडीयमवर जल्लोष करत थांबले असताना विरोधी हुल्लडबाजांनी रस्त्यावर येऊन त्यांनी रावणेश्वर मंदीर मार्गावरुन स्टेडीयवर जल्लोष करणाऱ्या शौकिनावर तुफान दगडफेक केली. त्यामध्ये काही जणांच्या डोक्यात दगड लागल्याने ते जखमी झाले. त्यामुळे रस्त्यावर दगडांचा खच पडला होता.मैदानातच फुटबॉल शौकिन अडकलेस्टेडीयमबाहेर हुल्लडबाजांनी तोडफोड सुरु केल्यामुळे मैदानातील शौकिन बाहेर येऊन गोंधळ वाढू नये म्हणून पोलिसांनी तातडीने स्टेडीयमवरील प्रवेशद्वारांना कुलूप ठोकले. त्यामुळे फुटबॉल शौकिन मैदानातच अडकल्याने दोन गटातील संभाव्य संघर्ष टळला. त्यावेळी पोलिसांनी लाठीमार करुन हुल्लडबाजांना पांगवले. काहींची धरपकड केली.परिसरात अंधाराचे साम्राज्यसामना संपला त्यावेळी सायंकाळी अंधार पडला होता, हुल्लडबाजांनी टेंबे रोडच्या दिशेची स्पर्धेची स्वागत कमान पाडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी रस्त्यावरील विजेच्या तारा तुटल्याने परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला, या अंधाराचा फायदा घेत हुल्लडबाजांनी वाहनांची तोडफोड केली.सभेमुळे अपुरा पोलीस बंदोबस्ततपोवनमध्ये भाजप-शिवसेनेच्या प्रचार सभेमुळे बहुतांशी पोलीस बंदोबस्त तेथेच अडकला, त्यामुळे काही प्रमाणात शाहू स्टेडीयममध्ये पोलीस बंदोबस्त होता. पण तोडफोडीची घटना घडल्यानंतर पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, शशिराज पाटोळे, रवि साळोखे हे अधिकारी घटनास्थळी आले.तीन वर्षानंतर पुन्हा उद्रेकतीन वर्षापूर्वी मुस्लीम बोर्डीग चषक फुटबॉल स्पर्धेवेळी पाटाकडील तालीम आणि दिलबहार तालीम यांच्यात झालेल्या अंतीम सामन्यानंतर हुल्लडबाजांनी रस्त्यावरील वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर वर्षभर या स्पर्धेवर पोलिसांनी निर्बध आणल्याने आणल्याने स्पर्धा बंद होत्या. त्यानंतर गेल्यावर्षी पुन्हा या स्पर्धाना काही नियम अटी लावून पुन्हा सुरु झाल्या, अन पुन्हा त्याच प्रमाणे वादाला तोंड फुटले.