स्वामी हे तीन दिवसांपूर्वी शिरढोण मार्गे चंदूर येथे दुचाकीवरून जात होते. दुचाकीला अडकविलेली बॅग शिरढोण रस्त्यावर पडली होती. यावेळी कोळी यांना बॅग सापडली होती. प्रवाशी बॅग शोधत येतील म्हणून कोळी यानी रस्त्यावर असलेल्या आपल्या घरासमोर बॅग अडकवून ठेवली होती. बॅगेमध्ये कपडे, रोख रक्कम व दागिने होते. मात्र बॅग शोधत कोणीच न आल्याने कोळी यांनी सोशल मीडियावर बॅग सापडली असल्याचे मेसेज पाठवले होते. मेसेज वाचून सोमवारी स्वामी यांनी बॅग हरवली असल्याचे सांगितले. यावेळी कोळी यांनी ग्रामपंचायत सदस्यांना बोलावून व खातरजमा करून बॅग परत दिली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने कोळी यांचा प्रामाणिपणाबद्दल सत्कार केला. यावेळी ग्रा. पं. सदस्य भास्कर कुंभार, शाबुद्दीन टाकवडे, ललिता जाधव उपस्थित होते.
हरविलेली बॅग प्रामाणिकपणे केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:19 AM