(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : महाराष्ट्रात हिंदू युवतींना लव्ह जिहादच्या जाळ्यातून वाचण्यासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, या मागणीसाठी विहिंप व बजरंग दलाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात निदर्शने केली. तसेच मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात दिले.
निवेदनात, राज्यातील कायदे हे लव्ह जिहादपुढे कमकुवत ठरवत आहे. अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर घडविणे चालू आहे. गत दोन-तीन वर्षांत दरमहा किमान दोन-तीन घटना घडत असून, हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, असे म्हटले आहे. निदर्शनामध्ये किशोर मोदी, पंढरीनाथ ठाणेकर, शिवप्रसाद व्यास, संतोष हत्तीकर, बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत, आदींनी सहभाग घेतला.
(फोटो ओळी)
०२१२२०२०-आयसीएच-०१
इचलकरंजीत विहिंप व बजरंग दलाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात निदर्शने केली.
(छाया : उत्तम पाटील)